मराठी

एकाच दिवशी तालुक्यात २३ रुग्णांचा भर

वरुड ११, शेंदुरजनाघाट ६, लोणी ३, सावंगा, बहादा, कुरळी प्रत्येकी १

वरुड ता.प्रतिनिधी/२३ ऑगस्ट – गेल्या ३१ जुलैपासुन शहरासह तालुक्यात कोरोना संक्रमीत (Corona infected) रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतांनाच आज पुन्हा वरुड शहरासह तालुक्यात एकुण २३ लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह (Corona report of 23 people positive) आल्याने शहरासह तालुक्यात कोरोना संक्रमीत रुग्णांची संख्या १०९ वर पोहचली आहे.
प्राप्त माहितीनुसार, कोरोनाचा संसर्ग थांबावा म्हणुन प्रशासनाकडुन विविध प्रकारे उपाययोजना करुन जनजागृती केल्याजात असली तरी मात्र एप्रिल, मे आणि जुन महिण्यात नागरीकांमध्ये असलेली कोरोना संदर्भात भिती मात्र आता दिसुन येत नाही. बाजारपेठेसह अनेक शासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा व्यापारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक कुठल्याच नियमांचे पालन करतांना आढळुन येत नाही. दरम्यान ऑगष्ट महिन्यात पॉझिटिव्ह आलेल्या लोकांच्या संपर्कातील नागरीकांचे थ्रोट स्वॅब अमरावती येथे पाठविण्यात आले होते. त्यामध्ये आज वरुड शहराच्या नयादायरा परिसरातील ५, इस्लामनगर ३, शिकलकरी परिसर २, पोलिस स्टेशनरोड वरील १ तर ग्रामिण भागातील शेंदुरजनाघाट येथील ६, लोणी ३, सावंगा १, बहादा १, कुरळी १ अश्या एकुण २३ लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे तालुक्यात आजपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकुण संख्या १०९ झाली असुन यापैकी ७५ रुग्ण बरे होवुन स्वगृही परतले, ३२ रुग्ण कोविड रुग्णालयात उपचार घेत आहे तर २ कोरोणा पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यु झाला आहे. दरम्यान शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग थांबावा म्हणुन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल देशमुख, वरुड ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रमोद पोतदार, वरुड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रविंद्र पाटील, शेंदुरजनाघाटचे मुख्याधिकारी गजानन भोयर, गटविकास अधिकारी वासुदेव कनाटे, वरुडचे ठाणेदार मगन मेहते, शेंदुरजनाघाटचे ठाणेदार श्रीराम गेडाम, बेनोडा (शहीद) चे ठाणेदार सुनिल पाटील तसेच या अधिका:यांचे सहकारी अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत असल्याचे दिसुन येत आहे.

Related Articles

Back to top button