देशात 25 कोटी कुपोषित
नवी दिल्ली दि २५ – देशात कुपोषित लोकांची एकूण संख्या सुमारे 25 कोटी आहे. ग्रामीण लोक आणि महिलांचे आरोग्य चांगले नाही. पौष्टिकतेची कमतरता असलेले बरेच लोक खेड्यात राहतात. पुरुषांपेक्षा स्त्रियांचे वजन जास्त आहे.
भोपाळमधील डायटीशियन डॉ. निधी पांडे म्हणतात की, जास्त वजन आणि कुपोषित असणे धोकादायक आहे. कुपोषित होण्याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी दारिद्र्य हे सर्वात मोठे कारण आहे, तर अतिरीक्त वजन होण्याचे एक कारण म्हणजे खाण्यापिण्याकचे दुर्लक्ष करणे. बॉडी वेट इंडेयस म्हणजेच बीएमआय. आरोग्य मंत्रालयाच्या मते पुरुषांचे वजन वयानुसार 5 किलो ते 65 किलो असावे, तर महिलांचे वजन 5 ते 60 किलो असावे, असे म्हटले आहे. या आधारावर सरकार बीएमआय बनवते. वेगवेगळ्या वयोगटाचे वजन निश्चित करते. कुपोषणामुळे शरीरात आजार उद्भवतात. मुंबईतील पोषण आहारतज्ज्ञ देवेश भार्गव म्हणतात की, कुपोषणाचे सर्वात मोठे कारण दारिद्र्य नक्कीच आहे; परंतु हे एकमेव कारण नाही. कमी शिक्षण आणि जनजागृतीचा अभाव हे देखील एक मोठे कारण आहे.
अन्न सुरक्षा अंतर्गत देशातील सरकार सर्वांना मूलभूत खाद्यपदार्थ पुरवित आहे. सामुदायिक केंद्रांमध्ये पौष्टिक औषधे आणि इंजेयशनची विनामूल्य व्यवस्था आहे. आरोग्य तपासणी देखील विनामूल्य आहे. येथे कोणीही त्यांचे वजन आणि रक्त तपासणी करू शकते.