मराठी

जगात 25 टक्के लोक बहिरे होणार !

मुंबई/दि.३ – जगातील प्रत्येक चार जणांमागे एक जण बहिरा असू शकेल. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जाहीर केलेल्या जागतिक अहवालात हा दावा केला आहे. अहवालानुसार, 2050 पर्यंत जगात बहिरे असणा-यांची सं‘या 250 कोटी होईल. डब्ल्यूएचओने कानातील समस्यांविषयी जागतिक अहवाल प्रथमच जाहीर केला आहे.
डब्ल्यूएचओच्या अहवालात असे म्हटले आहे, की संक‘मण, रोग, जन्मजात आजार, ध्वनिप्रदूषण आणि जीवनशैलीतील अडथळे यावर नियंत्रण ठेवून अशा घटनांना प्रतिबंध केला जाऊ शकतो. हे कमी करण्यासाठी, उपचार आणि प्रतिबंधनाच्या धोरणावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. अहवालानुसार सध्या प्रत्येकी पाच जणांपैकी एकाला ऐकण्याची समस्या आहे. 2050 पर्यंत 70 कोटींना गंभीर स्थितीत उपचारांची आवश्यकता भासू शकते.
डब्ल्यूएचओ ने अहवालात म्हटले आहे, की वेळेवर उपचार न मिळणे हे बहिरेपणाचे प्रमाण वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे. त्यातील 80 टक्के प्रकरणे कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात. जगातील एक अब्जाहून अधिक लोकांना कायमचा बहिरेपणा येण्याचा धोका आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे. स्मार्टफोनवर मोठ्या आवाजात संगीत ऐकण्यामुळे बहिरेपणा येऊ शकतो. 12 ते 35 वर्षे वयोगटातील लोक जोखीम विभागात आहेत. ऐकण्याची समस्येवरचा जगभरातील खर्च अंदाजे 750 दशलक्ष डॉलर आहे. डब्ल्यूएचओच्या तांत्रिक अधिकारी शैली यांच्या मते, जगातील एक अब्जाहून अधिक तरुण स्मार्टफोनमध्ये मोठ्या आवाजातील वेगवान गाणी ऐकण्याचा आनंद घेतात. यासाठी ते इयरफोन किंवा हेडफोन वापरतात. यामुळे ते बहिरे होऊ शकतात किंवा त्यांना कमी ऐकू येऊ शकते.

Related Articles

Back to top button