मुंबई/दि.२७ – प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर(Mahesh Manjrekar) यांच्याकडे खंडणीची मागणी करण्यात आली आहे. अंडरवल्र्डच्या नावे मांजरेकर यांच्याकडे ३५ कोटी रुपये मागितल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार अबू सालेमच्या टोळीतील एकाकडून ही धमकी देण्यात आल्याचे कळते. धमकीनंतर मांजरेकर यांनी दादर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मांजरेकर यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून खंडणी मागितल्याची आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सालेम टोळीकडून धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी मुंबईतील दादर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रत्नागिरीतील खेड येथून ३२ वर्षांच्या युवकाला काल ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्याचा अबू सालेमशी खरेच संबंध आहे का, या सर्व गोष्टींचा तपास पोलिस सध्या करत आहेत.