मराठी

३९ हजार २८७ बेरोजगारांना मिळाला रोजगार

मंत्री नवाब मलिक ने दिली माहिती

मुंबई/दि.२५- कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीचीही समस्या (Unemployment is also a problem due to the corona crisis) निर्माण झाली आहे. पण कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने या काळात आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे आणि महास्वयंम वेबपोर्टलमार्फत जुलै महिन्यात तब्बल 21 हजार 572 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. तत्पुर्वी एप्रिल ते जून याकाळात 17 हजार 715 अशा एकूण 39 हजार 287 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने http://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. एप्रिल ते जूनअखेर या वेबपोर्टलवर 1 लाख 72 हजार 165 इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यापैकी सुमारे 17 हजार 715 जणांना रोजगार मिळाला. त्यानंतर जुलै महिन्यात 58 हजार 157 बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. जुलैमध्ये मुंबई विभागात 12 हजार 151, नाशिक विभागात 08 हजार 526, पुणे विभागात 22 हजार 260, औरंगाबाद विभागात 6 हजार 275, अमरावती विभागात 03 हजार 366 तर नागपूर विभागात 05 हजार 579 इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. जुलैमध्ये 21 हजार 572 उमेदवारांना नोकरी मिळविण्यात यश आले आहे. मुंबई विभागातील 3 हजार 940, नाशिक विभागातील 1 हजार 321, पुणे विभागातील 14 हजार 521, औरंगाबाद विभागातील 1 हजार 105, अमरावती विभागातील 414 तर नागपूर विभागातील 271 उमेदवार नोकरीस लागले आहेत.

Related Articles

Back to top button