मराठी

ईपीएफओमधून काढले ३९ हजार कोटी

बचतीचा वापर दैनंदिन गरजांसाठी

मुंबई/दि. १५ – कोरोना विषाणूच्या साथीच्या वेळी कोट्यवधी लोकांनी नोक-या गमावल्या. एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) चा कामगारांना एकमेव आधार ठरला. गेल्या पाच महिन्यांत ईपीएफमधून कामगारांनी ३९ हजार चारशे कोटी रुपये काढले. दैनंदिन वापरासाठी ही रक्कम नागरिकांना उपयोगी पडली.
कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले, की 25 मार्च 2020 ते 31 ऑगस्ट 2020 दरम्यान ईपीएफमधून 39 हजार 402.94 कोटी रुपये काढले गेले. सर्वाधिक रक्कम (37 हजार 783.85 कोटी) महाराष्ट्रात काढली गेली. यानंतर कर्नाटकच्या लोकांनी ईपीएफ खात्यातून पाच हजार 743.96 कोटी रुपये आणि तामीळनाडू-पुडुचेरीने चार हजार 984.51 कोटी रुपये काढले. ईपीएफमध्ये जमा केलेली रक्कम कर्मचा-यांची मोठी साथ बनली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गंगवार यांनी लोकसभेला दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले, की यंदा 25 मार्च ते 31 मार्च दरम्यान ईपीएफ खात्यांमधून 39 हजार 402 कोटी 94 लाख रुपये काढले गेले आहेत. त्यातील 40 टक्क्यांहून अधिक महाराष्ट्र, तमीळनाडू आणि कर्नाटक या तीन औद्योगिक राज्यांतील आहेत. सर्वाधिक पैसा महाराष्ट्रात काढला गेला आहे.
महाराष्ट्रातील कर्मचा-यांनी सात हजार 837.85 कोटी रुपये काढले. यानंतर कर्नाटक (KARNATAK) दुस-या क्रमांकावर आहे. जिथे लोकांनी ईपीएफ खात्यातून पाच हजार 743 कोटी 96 लाख रुपये काढले आहेत.
तामीळनाडू आणि पुडुचेरी येथील लोकांनी चार हजार 984 कोटी 51 लाख रुपये काढले गेले. त्याच वेळी नवीदिल्लीमधील नागरिकांनी टाेबंदी दरम्यान ईपीएफ खात्यातून दोन हजार 940 कोटी 97 लाख रुपये काढून घेण्यात आले. गंगवार म्हणाले, की आर्थिक दिलासा देण्यासाठी एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान ईपीएफओने ९४ लाख 4१ हजार दाव्यांचे निराकरण केले आणि त्यामधून पाच लाख 54 हजार 555 कोटी रुपये काढले. गेल्या वर्षी एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान केलेल्या दाव्यांपेक्षा हे प्रमाण 32 टक्क्यांनी जास्त होते.

Related Articles

Back to top button