मराठी

जिल्ह्यात 24 तासात 43 पॉझेटिव्ह

 दोघांचा मृत्यु  

यवतमाळ/दि. 3 – जिल्ह्यात गत 24 तासात 43 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. मृत झालेल्यांमध्ये वणी शहरातील 59 वर्षीय आणि दारव्हा तालुक्यातील 63 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 43 जणांमध्ये 28 पुरुष व 15 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 19 पुरुष व 13 महिला, पुसद तालुक्यातील दोन पुरुष, आर्णि शहरातील एक महिला, बाभुळगाव तालुक्यातील दोन पुरुष, दिग्रस तालुक्यातील एक महिला, वणी तालुक्यातील एक पुरुष, घाटंजी शहरातील एक पुरुष, नेर तालुक्यातील एक पुरुष, कळंब तालुक्यातील एक पुरुष आणि दारव्हा तालुक्यातील एका पुरुषाचा समावेश आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून माहिती प्राप्त न झाल्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत 218 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये भरती असणा-यांची संख्या निरंक असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाने म्हटले आहे.  सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 8726 झाली आहे.  जिल्ह्यात 272 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 256 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 75932 नमुने पाठविले असून यापैकी 75186 प्राप्त तर 746 अप्राप्त आहेत. तसेच 66460 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

Related Articles

Back to top button