मराठी

विज पडून ५ बक:यांचा जागीच मृत्यू

तालुक्यातील खापरखेडा शेतशिवारातील घटना

वरुड/दि. २२ – दुपारच्या सुमारास आलेल्या वादळी वा:यादरम्यान अचानक विज पडल्याने ५ बक:यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल (ता.२१) तालुक्यातील खापरखेडा शेतशिवारात सायंकाळच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दोन शेळीपालकांचे मोठे नुकसान झाले.
प्राप्त माहीतीनुसार, काल सायंकाळच्या सुमारास अचानक वादळ सुरु झाले आणि या वादळादरम्यान अचानक विजेचा कडकडाट होवु लागला. याच दरम्यान खापरखेडा लगतच्या रामपूर शेतशिवारामधील स्व.रतनलाल खंडेलवाल यांचे शेतालगत चरत असलेल्या बक:या अचानक या विजेच्या कडकडामध्ये सापडल्या आणि विज त्यांच्या अंगावर पडल्याने या दुर्घटनेत ५ बक:यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमध्ये नाणी गोपी सरीयाम व सरस्वती छंनू धुर्वे यांचे मोठे नुकसान झाले. विज पडून बक:यांचा मृत्यू झाल्याची माहीती मिळताच आज तलाठी एस.व्ही.खेरडे यांनी घटनास्थळावर जावुन पंचनामाक केला.
नुकसान झालेल्या शेळीपालकांना शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी गावक:यांनी केली आहे.

Back to top button