मराठी

जिल्ह्यात दोन मृत्युसह 511 जण नव्याने पॉझेटिव्ह

 194 जण कोरोनामुक्त

यवतमाळ/दि. 2 – गत 24 तासात जिल्ह्यात दोन मृत्युसह तब्बल 511 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 194 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये बाभुळगाव तालुक्यातील 73 वर्षीय आणि मारेगाव तालुक्यातील 67 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. मंगळवारी पॉझेटिव्ह आलेल्या 511 जणांमध्ये 303  पुरुष आणि 208 महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळातील 174, पुसद 164, दिग्रस 34, दारव्हा 28, पांढरकवडा 18, बाभुळगाव 17, उमरखेड 13, आर्णी 12, घाटंजी 12, वणी 09, महागाव 04, कळंब 02, मारेगाव 01 व इतर 1 रुग्ण आहे.
मंगळावारी एकूण 2736 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 511 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 2225 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1803 एक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 18086 झाली आहे. 24 तासात 194 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 15816 आहे. तर जिल्ह्यात एकूण 467 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 164838 नमुने पाठविले असून यापैकी 164313 प्राप्त तर 525 अप्राप्त आहेत. तसेच 146227 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Related Articles

Back to top button