मराठी

महावितरणात 7 हजार पदांची भरती होणार

ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत ने दिले आदेश

अकोला/दि.६- ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत महावितरणातील पदे तातडीने भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार महावितरण कंपनीत उप-केंद्र सहायक (2000) व विद्युत सहायक (5000)अशा तब्बल 7 हजार पदांची भरती करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. महावितरणमध्ये अनेक पदे रिक्त असून, ही पदे भरण्याबाबत रेटा वाढला होता. याची दखल घेत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी 23 जून रोजी उपकेंद्र सहायक व विद्युत सहायकांची पदे भरण्याचे आदेश 23 जून रोजी दिले होते; परंतु कोरोना संकटाच्या पृष्ठभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती. मंगळवारी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी ही पदे तातडीने भरण्याचे निर्देश दिले.महावितरणकडून ही भरती दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात उप-केंद्र सहायकांचे दस्तावेज तपासणी करून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर विद्युत सहायक पदासाठीच्या परीक्षांचा निकाल जाहीर करून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. 7000 जागांची भरती असल्याने फिजिकल डिस्टन्सिंग आणि कोविड प्रतिबंधात्मक नियमांच्या अधीन राहून ही पदभरती करण्याचे निर्देश ऊजामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button