मराठी

वरुड मोर्शी मार्गावरील वाहनांना नांदगाव पेठ टोल नाक्यावर आजपासून ७५% सूट !

आमदार देवेंद्र भुयार यांनी मानले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार रामदास तडस यांचे आभार

  • आमदार देवेंद्र भुयार यांनी विधानसभेत मांडला होता औचित्याचा, तारांकित प्रश्न

अमरावती प्रतिनिधी /17- नागपूर राष्ट्रीय महामार्ग ६ वर असलेल्या नांदगाव पेठ या टोल नाक्यावर मोर्शी -वरुडकडून येणार्‍या वाहनधारकांना या राष्ट्रीय महामार्गाचा केवळ ८ किलोमीटर साठीच वापर केला जातो. परंतु भुर्दंड मात्र ५० किलोमीटरचा सोसावा लागतो. त्यामुळे अमरावतीमधून महामार्ग गेल्यापासून या मार्गावर मोर्शी- वरुड वासीयांना आवागमन करतांना टोल वसुलीचा आर्थिक फटका सहन करावा लागत होता.
अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पेठ येथील टोल नाका हा नागरिकांसाठी डोके दुखी बनला होता. मोर्शी,नांदगाव पेठच्या व तिवसा च्या नागरिकांना नाहक भुर्दंड बसत आहे, काही अंतरासाठी नागरिकांना टोलवर पैसे मोजावे लागतात. त्यामुळे हा नागरिकांवर अन्याय आहे. नांदगाव पेठच्या टोल नाका वरून मोर्शी वरुड येथील नागरिकांना याच टोल नाका वरून अमरावतीला जावे लागते मात्र 8 किलोमीटर अंतर गाठण्यासाठी वाहन चालकांना नांदगाव पेठच्या टोल नाक्यावर १३० रुपये मोजावे लागतात. त्यामुळे यावर लक्ष देण्याची मागणी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी २५ डिसेंबर २०२० रोजी विधानसभेत तारांकित प्रश्न औचित्याच्या मुद्द्यावर बोलतांना केली होती त्यावर बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर टोलमुक्ती बाबतचा निर्णय घेण्याची मागणी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नवी दिल्ली यांच्याकडे केली होती.
     टोल कृती समितीने हा विषय आमदार देवेंद्र भुयार यांच्या लक्षात आणून दिला त्यानंतर आमदार देवेंद्र यांनी मोर्शी येथील विश्रामगृह येथे टोल कृती समितीची बैठक घेऊन टोल मुक्ती कारण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे हा विषय मांडून मोर्शी वरुड तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळवून देण्याची मागणी केली होती. राष्ट्रीय महामार्ग क्र.६ अमरावती – नागपुर महामार्गावर नांदगांव पेठ येथे टोल नाका असून. सदर रस्त्यावरुन मोर्शी विधान सभा मतदार संघातील मोर्शी वरुड तालुक्यातील जनतेस अमरावती येथे ये-जा करतांना तसेच अमरावती येथील नागरीकांना मोर्शी – वरुड जातांना फक्त ६-७ कि.मी. अंतर वाहतुकी करीता वापरासाठी पुर्ण टोल आकारणी द्यावी लागत होती. त्यामुळे जनतेस हा भुर्दड बसत असल्यामुळे जनतेमध्ये अत्यंत असंतोष निर्माण झाला होता. त्यासाठी आमदार देवेंद्र भुयार, बाळू पाटील कोहळे तालुका अध्यक्ष रा.कॉ.पा., मोर्शी नगराध्यक्ष सौ.मेघनाताई मडघे , वरुड नगराध्यक्ष स्वातीताई आंडे, शेघाट नगराध्यक्ष रुपेश मांडवे,  दिलीप गवई, ननिलेश मगर्दै, प्रदिप बाजड, विशाल तिजारे, प्रा.संजय पांडव यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सोबत दिनांक ३१.१०.२०२० रोजी नागपुर येथील कार्यालयात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती त्या  बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोल मुक्ती करण्यासाठी वरुड मोर्शी तालुक्यातील नागरिकांच्या समस्या समजुन घेवुन त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यासाठी संबंधितांना निर्देश देऊन पोटतिडकीने सतत  प्रयत्न केल्यामुळे मोर्शी मतदार संघाची समस्या काही प्रमाणात निकाली निघाली. ही अत्यंत समाधानाची बाब आहे. दि. १४.०१.२०२१ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खा.रामदासजी तडस यांनी पुढाकार घेवुन संबधीत आयआरबी कंपनीस व संबधीत खात्यास सुचना देवुन दि.१५.०१.२०२१ पासुन विहीत अटीवर अमरावती वरुन मोर्शी – वरुड व अमरावतीला येणा-या वैयक्तीक बाहनांना फक्त २५% टोल नाका आकारणी करण्याचा निर्णय घेवुन तात्काळ अंमलबजावणीचे निर्देश दिले यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार रामदास तडस यांची आभार मानले .
गेल्या अनेक वर्षापासून नांदगाव पेठच्या टोल नाक्याचा मुद्दा हा वरुड मोर्शी तालुक्यातील नागरिकांसाठी डोके दुखी ठरला होता . या टोल नाक्यावर मोठी रक्कम वाहन चालकांना मोजावी लागत होती त्यामुळे वरुड मोर्शी तालुक्यातील नागरिकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत होता कृती समितीने हा विषय माझ्याकडे मांडला आणि आमदार सुलभाताई खोडके, पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर, आणि मी हा विषय हिवाळी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न, औचित्याचा मुद्दा मांडला आणि यशोमती ठाकूर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क करून सहकार्य केले, आम्ही टोल कृती समिती आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  यांच्यासोबत बैठक घेऊन वरुड मोर्शी तालुक्यातील नागरिकांना न्याय मिळवून दिलासा देण्यासाठी सतत पाठपुरावा करून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी वरुड-मोर्शी मार्गावरील वाहनांना टोल मध्ये ७५% टक्के सूट दिली असून वरुड मोर्शी तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला  अजून आमचा लढा संपला नसून आम्ही ६ किमी रोड  वापरत आहे  तेवढाच टोल आम्ही भरणार जोपर्यंत आम्हाला पूर्ण न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहणार  — आमदार देवेंद्र भुयार

Related Articles

Back to top button