अमरावती प्रतिनिधी/ ९ ऑगस्ट – कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा परिषदेत कोविड १९ चा संसर्ग पसरू नये, यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून शनिवारी जिल्हा परिषदेतील ८१ अधिकारी व कर्मचाèयांचे थ्रोट स्वॅब नमुने घेण्यात आले. अमरावती शहरासह ग्रमीण भागात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्ग वाढू नये याकरिता शासन व प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. अशातच जिल्हा परिषदेतही अलीकडच्या काळात सहा कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाèयांमध्ये चिंता वाढली होती. ग्रामीण भागातुन विविध कामानिमित्त नागरिक जिल्हा परिषदेत योतात. त्यामुळे त्यांचा संपर्क संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचार्यांशी येतो. याशिवाय जिल्हा परिषदेत ५० वर्षापेक्षा अधिक वयोगाटातील जोखीमग्रस्त अधिकारी व कर्मचाèयांचे थ्रोट स्वॅब तपासणीचा निर्णय घेण्यात आला. याकरिता मुख्यकार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनात ही प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे, श्रीराम कुळकर्णी, कार्यकारी अभियंता प्रशांत गावंडे, राजेंद्र सावळकर, प्रमोद तलवारे यांच्यासह ८१ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नमुने घेण्यात आले.