वरुड/दि . ४ – कत्तलीसाठी जात असलेल्या ९ गाईना वरुड पोलिसांनी जीवनदान दिले आहे. एका मिनीट्रकमधून गाई कत्तलीसाठी जात असल्याच्या गुप्त माहीतीवरुन वरुड पोलिसांनी शहरातील जायंटस् चौक परिसरात दबा धरुन बसले असता आरोपी हा त्याच्या ताब्यात टाटा झेनॉन पिकप क्रमांक एम.एच.०७ पी २०३९ ही भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवत असताना दिसून आला त्याला थांबण्याचा इशारा दिला असता न थांबता त्याच्या ताब्यातील पिकअप हे घटनास्थळावर सोडून पळून गेला.
या मिनिट्रकमध्ये ९ गोवंश जातीच्या गाई किंमत अंदाजे ९५ हजार रुपये ह्या कोंबून दाबून निर्दयीपणे जनावराची वाहतूक करीत असताना मिळून आला. या प्रकरणी वरुड पोलिसांनी हे.काँ.गजानन गिरी यांच्या फिर्यादीवरुन एम.एच.०७ पी २०३९ क्रमांकाच्या चालकाविरुध्द कलम ११ (क) (ड) प्राण्यांची निर्दयीपणाने वाहतूक करणे, सहकलम ५ (अ), ९ महाराष्ट्र प्राणी सुधारणा अधिनियम सहकलम ११९/१७७ मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मगन मेहते यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक हेमंत चौधरी, हेकॉ.गजानन गिरी, शेषराव कोकरे, सागर लेवरकर आदी करीत आहेत.