मराठी

प्रकाश काळबांडेंसाठी एकवटला शिक्षकांचा समुदाय

ठिकठिकाणी स्वागत, निवडणूकीसाठी उत्साह

अमरावती २१ – विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील अधिकृत उमेदवार प्रकाश काळबांडे यांच्या प्रचार दौऱ्याने सध्या चांगलाच वेग घेतला आहे. प्रकाश काळबांडे यांना निवडून आणण्यासाठी सर्वदूर असलेला शिक्षक समूदाय एकत्र येऊ लागला आहे. प्रकाश काळबांडे यांच्या दौऱ्यादरम्यान ठिकठिकाणी त्यांचे स्वागत शिक्षक वर्गाकडून होत असून यंदाच्या निवडणूकीत प्रकाश काळबांडे यांनीच बाजी मारावी यासाठी शिक्षकांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून येत आहे.
आज अकोला शहर तसेच जिल्ह्यातील दौऱ्यात प्रकाश काळबांडे यांनी शिक्षकांच्या भेटी घेतल्या. यामध्ये श्री शिवाजी विद्यालय मुख्य शाखा, नुतन हिंदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, उटांगळे कॉन्व्हेंट, महिला आयटीआय, न्यू इंग्लिश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, न्यू ईरा हायस्कूल, भाऊसाहेब तिरूख विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खिरपुरी, श्रीमती यशोदाबाई इंगळे विद्यालय व  कनिष्ठ महाविद्यालय व्याळा, जागेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडगाव, श्रीमती धनाबाई विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय बाळापूर इत्यादी शाळांमध्ये प्रकाश काळबांडे यांच्यासह विमाशि संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. यावेळी डॉ. राजेन्द्र तीरुख, कल्पना धोत्रे, भगवान मोरे, अशोक मंडले यांनी सर्व शिक्षक बंधू भगिनींना विमाशिचे अधिकृत उमेदवार काळबांडे प्रकाश बाबाराव यांना पसंती क्रमांक एकचे मत देवुन विजयी करण्याचे जाहीर आवाहन केले.
या बैठकांना प्रामुख्याने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सर्व राज्य तसेच जिल्हा पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिक्षक बांधन भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी काळबांडे यांच्या विजयासाठी एकत्रित येऊन सातत्याने आम्ही प्रयत्नरत असून त्यांचा विजय पक्काच असल्याचा विश्वास देखील स्थानिक शिक्षकांनी व्यक्त केला.

Related Articles

Back to top button