मराठी

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात होणार ध्वजारोहण सोहळा

भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापनदिन समारंभ

अमरावती, दि. 12 : भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापनदिन समारंभ शनिवारी (15 ऑगस्ट) साजरा केला जाणार आहे. जिल्ह्यात मुख्य ध्वजारोहण सोहळा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऐड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (15 ऑगस्ट) सकाळी 09.05 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या सर्व दक्षता सूचनांचे पालन करून हा समारंभ साजरा केला जाणार आहे. यानिमित्त यादिवशी सकाळी सहा ते सकाळी 11.30 या वेळेत संचारबंदीत शिथीलता आणण्याचा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला आहे. कोरोनाची साथ लक्षात घेता सर्वांनी दक्षतेचे काटेकोर पालन करून स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता ध्वजारोहण होणार आहे.

Related Articles

Back to top button