मराठी

गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीही काँग्रेसची अध्यक्ष?

खा. अहमद पटेल यांचे मत; कोरोना संपल्यानंतर पक्षाध्यक्ष निवड

नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष गांधी कुटुंबाहेरीलदेखील होऊ शकतो, असे मत काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष आणि राज्यसभेतील खासदार अहमद पटेल (Rajya Sabha MP Ahmed Patel) यांनी व्यक्त केले. काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीपूर्वी काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रानंतर (Letters written by 23 senior Congress leaders to Sonia Gandhi) काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या हालचालींनंतर पटेल यांनी हे मत व्यक्त केले आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर पक्षाध्यक्षाची निवडणूक घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. पक्षाने आता गांधी कुटुंबाबाहेरील नेत्याची अध्यक्षपदी निवड करावी, असे ऑगस्ट २०१९ मध्येच सोनिया यांनी काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत सांगितले होते. ज्या नेत्याची अध्यक्षपदी निवड होईल त्याने एकजुटीने काम करावे, असेही सोनिया यांनी म्हटल्याची आठवण पटेल यांनी करून दिली. पत्र लिहिणे हा पक्षाचा अंतर्गत मालला आहे. संसदीय मंडळ, संवेदनील प्रकरणांवर लोकांशी विचार-विनिमय करण्याची पक्षात एक व्यवस्था आहे, या व्यवस्थेत सोनिया या अध्यक्ष म्हणून काम करत राहतील आणि सोनिया यांना मदत करण्यासाठी एक व्यवस्था तयार केली जाईल. पत्रामधील अनेक गोष्टी विरोधाभासी आहेत. जसे की एका ठिकाणी पक्ष नेतृत्वाला ग्रेट म्हटले आहे, तर दुसरीकडे सामूहिक नेतृत्वाची चर्चा करण्यात आली आहे, असे पटेल म्हणाले. पटेल पुढे म्हणाले, की राहुल यांनी पुन्हा पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे, याचे समर्थन काँग्रेस कार्यकारी समितीच्या सदस्यांनी केले होते. विद्यमान काँग्रेस अध्यक्षांनाही मतभेद दूर करण्याचा अनुभव आहे आणि त्यांनी नव्या विचारांसाठी दरवाजे नेहमीच उघडे ठेवले आहेत.

Related Articles

Back to top button