मराठी

पोलिस अधिका-यानेच करवला शेतक-यावर खुनी हल्ला

प्र्तिरनिधी/दि.३
पुणे -पुणे जिल्ह्यातील चाकण येथील शेतकरी पोपट घनवट यांच्यावर आठ ते दहा लोकांनी खुनी हल्ला केला. त्यात घनवट जखमी झाले.  हा हल्ला पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घडवून आणला असल्याचा आरोप घनवट यांनी केला आहे. घनवट यांच्या फिर्यादीवरून चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात चव्हाण यांना आरोपी करण्यात आले आहे. चव्हाण हे सध्या रत्नागिरी येथे जात पडताळणी विभागात कार्यरत आहेत.

Back to top button