पांढरकवडा येथे योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळला
युवतीवरील अत्याचाराच्या विरोधात वाल्मिकी समाजाचा संताप
यवतमाळ/दि. २ – उत्तरप्रदेश येथील हाथरस तालुक्यातील बूलगाडी या गावामध्ये झालेल्यायुवतीवरील सामुहिक अत्याचार व हत्याकांडाचा आज पांढरकवडा येथील वाल्मिकी समाजाने निषेध व्यक्त केला. यावेळी उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान स्व. मनिषा वाल्मिकी या युवतीला मेणबत्ती प्रज्वलित करूनशेतकरी नेते किशोर तिवारी तसेच उपस्थित नागरीकांनी श्रध्दांजलीअर्पण केली.
स्व. मनिषा वाल्मिकी या युवतीवर झालेल्या सामुहिक अत्याचार व हत्याकांडानेसंपूर्ण देश हादरून गेला आहे. या प्रकाराचा करावा तेवढा निषेध कमी आहे. एवढीभयानक घटना घडूनही पोलिस प्रशासनाने दाखविलेली असंवेदनशिलतासमाजात चीड निर्माण करणारी आहे. यावरून उत्तरप्रदेशातील योगी सरकारचाखरा चेहरा समोर येतो व कायदा- सुव्यवस्थेची परिस्थिती यावरून स्पष्ट होते,अशी भावना शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी व्यक्त केली. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री पदावरुन योगी यांनी राजीनामा देण्याची मागणी सुध्दा त्यांनी केली आहे. यापुर्वी सुध्दा अशा दलित अत्याचाराच्या व हत्याकांडाच्याघटना त्याठिकाणी घडल्या आहेत. वास्तविक पाहता या भयावह परिस्थितीलासर्वस्वी जबाबदार असलेले मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांचे सरकार त्वरितबरखास्त करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी नागरीकांनी केली आहे. याबाबतत्वरित पिडीत कुटूंबाचे पुनर्वसन करावे, या प्रकाराची न्यायलयीन प्रकियाजलदगती न्यायलयात करावी तसेच आरोपींना फाशी देण्याची मागणीकिशोर तिवारी यांनी केली आहे.
महाराष्ट्रात आंदोलन करणार
उत्तरप्रदेश येथे वाल्मिकी समाजाच्या तरुणीसोबत घडलेला प्रकार अत्यंत निंदणीय आहे. योगी सरकारचा असंवेदनशील पणा संताप आनणारा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वाल्मिकी समाज संतप्त असून संपुर्ण महाराष्ट्रात आम्ही या विरुध्द आंदोलन करणार आहो.