मराठी

तृतीय पंथीयाने उघडले दिल्लीत कॅफे हाऊस

नवीदिल्ली/दि.३० – तृतीय पंथीयांना समाजात अनेक मानहानी, अपमानकारक प्रसंगांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत दिल्लीत उरूजने एक कॅफे हाऊस सुरू करून अन्य तृतीय पंथीयांना व्यवसायाची नवी दिशा दाखवून दिली आहे.
उरूजला २२ वर्षांचा होईपर्यंत मुलगा होता; परंतु मुलगा म्हणून जगणे त्याला योग्य वाटत नव्हते. त्याची  सारी लक्षणे बायकी होती. त्याने २०१४ मध्ये लिंग बदलाची शस्त्रक्रिया केली.उरुज हुसेन हिने नोएडाच्या सेक्टर ११ मध्ये तिचे कॅफे सुरू केले. तिला आशा आहे, की हे कॅफे ट्रान्सजेंडर समाजातील इतरांना स्वतःचे व्यवसाय स्थापित करण्यासाठी प्रेरित करेल. उरुजने आपल्या कॅफेचे नाव ‘स्ट्रीट टेम्प्शन’ ठेवले. कामाच्या ठिकाणी ब-याच वेळा तिला वाईट वर्तनाचा सामना करावा लागला. या छळाला कंटाळून उरुजने कॅफे उघडले. ती म्हणते, की हे कॅफे सर्वांना समान वागणूक देण्यासाठी प्रसिद्ध  असेल. हुसेन यांनी आपले काम सुरू करण्यापूर्वी आतिथ्य, औद्योगिक प्रशिक्षण आणि इतर अनेक कामे केली होती.
उरुजच्या म्हणण्यानुसार, माझ्या कॅफेमध्ये कोणालाही छळ सहन करावा लागणार नाही. या कामाचा माझ्या पालकांनाही अभिमान आहे. ” अजूनही अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत असल्याचे तिने सांगितले. तिला कोणतीही किंमत मोजून आत्मसन्माला धक्का लागू द्यायचा नाही.  टाळेबंदीच्या काळात शरीरविक्रय करणा-या महिलांना आणि त्यांच्या मुलांना तिने मदत केली. ती मुलगी असल्याचा आनंद आहे आणि तिला मोकळेपणाने वाटते.

Related Articles

Back to top button