अमरावती/दि.४ – आधार फाउंडेशनचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा शुक्रवारी (दि.२) रात्री श्री संत गाडगे बाबा मंदिसभागृह येथे उत्साहात झाला. गुणवत्ता विध्यार्थी व उत्कृष्ट पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप बाजड यांच्या तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जेष्ठ नागरिक सुरेश भारंबे, महावितरणचे माजी कार्यकारी अभियंता जीवन सदार तर आधारफाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप बाजड यांच्यासह व्यासपीठावर आदी मान्यवर उपस्थित होते.
निराधारांची सावली व अनाथांची माऊली असणा-या “आधार” परीवाराने २ ऑक्टोंबरला लावलेलं रोपट आता वटवृक्षात रुपांतरीत होते आहे, प्रदीप बाजड यांच्या विचाराने चालत असलेल्या आधारला आपल्या सर्वांची साथ लाभत आहे, त्यामुळं इतरांचे आयुष्य बदलण्यात आधार पुढंही नक्कीच यशस्वितेचे शिखर गाठल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन जेष्ठ नागरिक सुरेश भारंबे यांनी व्यासपीठावरून व्यक्त केले, तर जीवन सदार म्हणाले कि प्रदीपभाऊ यांच्या विचारसरणीतून आधारने माणसाला माणूस जोडला, माणूसपण जपले, माणसाचे माणुसकीचे व हृदयाचे नाते जोडले आहे असे व्यक्तव्य आधार सामाजिक संस्थेच्या ५ व्या सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावरून बोलतांना केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे सर्वप्रथम पूजन करून आधारच्या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली, तर सामाजिक संस्थेचे दिवंगत पदाधिकारी दीपक भेलकर यांच्या गेल्याने ती पोकळी भरून निघणार नसल्याने त्यांना श्रद्धाजंली देत त्यांच्या आठवणीवर एक चित्रपट दाखविण्यात आला त्यावेळी संपूर्ण सभागृहातील सदस्य अश्रूंनी गहिवरले होते. कार्यक्रमाच्या मध्यांतात आधारला सहकार्य करणा-या उत्कृष्टगुणवत्ता विध्यार्थी-विध्यार्थिनी सुरभी भेलकर, अखिलेश खडेकार, देव हरवानी व उत्कृष्ट कार्य व आधारला स्वरबद्ध करणारे आकाशवाणीचे निवेदक नितीन भट तसेच लेखक -गायक प्रा.डॉ.राजेश उमाळे, ज्यांनी ५ वर्षाच्या आधार कार्याचा लेखाजोखा चित्रपटाच्या माध्यमातून दर्शकांसमोर ठेवणारे आमीन शेख व आधारला सहकार्य करणा-या समस्त सदस्यांचा सन्मान व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
आधारच्या सेवापूर्ती कृतज्ञता सोहळ्याला डॉ.अनिल ढवळे, प्रा.अनंत बाजड, प्रा.रामेश्वर वसु, राजेश ढीगवार, संजय राऊत, अरविंद विंचूरकर, वैशाली प्रदीप बाजड, प्रा.डॉ.चित्रा ढवळे, प्रा. सविता बाजड, अनिता बाजड, वसंतराव भाकरे, गजानन गाढवे, संदीप बाजड, सतीष श्रीरसागर, सुनील बुरघाटे, आशिष ठाकरे, विशाल तिजारे, हर्षल श्रीखंडे, ऋषिकेश बाजड, अभिषेक बाजड यांच्यासह आदी उपस्थित होते.