मराठी

अब्दुल्ला पितापुत्रांनी घेतली मेहबूबा मुफ्तींची भेट

श्रीनगर/दि.१४ – नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतली. या बैठकीनंतर उमर अब्दुल्ला यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आम्ही मेहबूबा यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो. मेहबूबा यांना मंगळवारी नजर कैदेतून मुक्त करण्यात आले. जम्मू-काश्मीर प्रशासनाचे प्रवक्ते रोहित कंसल यांनी ही माहिती दिली. काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मेहबूबा यांना ताब्यात घेण्यात आले होते. मेहबूबा एक वर्ष, दोन महिने आणि नऊ दिवसांनी म्हणजेच एकूण ४३६ दिवसांनंतर नजरकैदेतून सोडण्यात आले. सुटका झाल्यानंतर मेहबूबा म्हणाल्या, की ५ ऑगस्ट २०१९ च्या काळ्या दिवसाचा गडद निर्णय, प्रत्येक क्षण माझ्या हृदयावर आणि आत्म्यावर हल्ला करीत राहिला. त्या दिवसाचा अपमान आपल्यापैकी कोणीही विसरू शकत नाही.

Related Articles

Back to top button