मराठी

अभिषेक बच्चन उपचारानंतर २८ दिवसांनी परतले घरी

अभिनेता अभिषेक बच्चननेही कोरोनावर मात केली

मुंबई दि . ८ -अमिताभ बच्चन नंतर त्यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चननेही कोरोनावर मात केली आहे. नुकताच अभिषेकचा कोरोना अहवाल नकारात्मक आला आहे. अभिषेक यांनी स्वत: ‘सोशल मीडिया‘च्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. अभिषेक यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करून सर्वांना सांगितले, की त्यांची कोरोना चाचणी नकारात्मक आली. अभिषेकने आपल्या ट्विटमध्ये सर्वांचे आभार मानले.

Back to top button