मराठी

शहरवासियांच्या विकासकामांना गती द्या

आरोग्य सभापती अॅड.योगेश चौधरी यांची जिल्हाधिका:यांकडे मागणी

वरुड/दि.२७ – शहरवासियांच्या विकास कामांना गती द्या, अशी मागणी करणारे निवेदन नगर परिषद आरोग्य सभापती अॅड.योगेश चौधरी यांनी जिल्हाधिका:यांकडे सादर केले आहे.
या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, वरुड नगर परिषदची गेल्या २३ जुलै व २१ सप्टेंबर रोजी सर्वसाधारण सभा झाली. सदर्हु सभेमध्ये नगराध्यक्ष यांनी जनतेच्या सोईक रिता विविध ठराव घेतले होते. त्यामध्ये लॉकडाऊन काळातील पाणीपट्टी व घर टॅक्स वरील व्याज माफ करणे, नवीन अग्रीशामक खरेदी करणे, जनतेकरिता कारडीयाक अॅब्युलन्स व साधी अॅब्युलन्स खरेदी करणे, वरुड मध्ये विविध ठिकाणी होत असलेले अपघातामुळे रस्ता सुरक्षा विषयक कामांची अंबलबजावणी करणे तसेच विविध भागातील पाण्याच्या समस्याचे निराकरण करणे, विविध नाल्या व रस्ते बांधकाम करणे, असे बरेचसे काम जी वरुडच्या जनतेच्या हिताचे होते मात्र काही नगर सेवकांना नगराध्यक्षा ना पदावरुन हटविणे व स्वत:ला पदावर बसविणे हे जनतेच्या कामापेक्षा महत्वाचे झाले आहे की, स्वत:च्या प्रभागातील जनहितार्थ कामांना सुद्धा विरोध दर्शविला. त्यामुळे सभागृहातील काही सदस्यांनी सदर्हु ठरावांना विरोध केला, त्याबाबतची संपुर्ण माहिती मनोज गुल्हाने, शुभांगी भारत खासबागे, मंदा आगरकर, हरिश कानुगो, अॅड.योगेश चौधरी व मुन्ना तिवारी यांनी सर्व वृतांत जिल्हाधिका:यांना भेटुन सांगितले व जनहितास योग्य ती दखल कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.

Related Articles

Back to top button