मराठी

लोकलमध्ये सर्व महिलांना प्रवेश

 मुंबई/दि. १६ – मुंबईच्या लोकलमधून आता सर्व महिलांना प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारने तसे परिपत्रक काढले. उद्यापासून म्हणजे शनिवारपासून होणारया शारदीय नवरात्र उत्सवापासून महिलांना लोकल प्रवासाची परवानगी देऊन राज्य सरकारने महिलांना गोड बातमी दिली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नाही. त्यामुळे लोकलमध्ये गर्दी होऊ नये, या दृष्टीने महिलांना लोकल प्रवास सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत तर संध्याकाळी ७ नंतर शेवटची लोकल असेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी महिलांना राज्य सरकारने दिली आहे. महिलांकरिता लोकलने प्रवास करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. १७ ऑक्टोबरपासून सरसकट सर्व महिलांना लोकल प्रवास करत येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत तर संध्याकाळी ७ नंतर शेवटची लोकल असेपर्यंत सर्व महिला प्रवास करू शकणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे मुंबई आणि एमएमआरमधील महिलांना प्रवेश करता येणार आहे.

Related Articles

Back to top button