मराठी

छेडछाडीतून वाचण्याच्या प्रयत्नांत हुशार विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू

स्कॉरलशिप वाचण्याच्या प्रयत्नात मृत्यू

बुलंदशहर दि. ११ – अमेरिकेत तब्बल चार कोटी रुपयांची स्कॉरलशिप मिळवलेल्या सुदीक्षा भाटी हिचा छेडछाडीपासून वाचण्याच्या प्रयत्नात अपघाती मृत्यू झाला. अभ्यासात हुशार असलेली सुदीक्षा दोन वर्षांपूर्वी इंटरमिजिएट परीक्षेत बुलंदशहर जिल्ह्यात प्रथम आली होती. त्यानंतर स्कॉलरशिपच्या जोरावर ती उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेली; मात्र कोरोनामुळे भारतात आलेल्या सुदीक्षाला काही मुलांमुळे आपला जीव गमवावा लागला. काकांसमवेत नातेवाइकांकडे स्कूटरवरून जात असताना बुलेटवरून काही मुले सुदीक्षाचा पाठलाग करत होती. रस्त्यात बुलेटसवार मुलांनी सुदीक्षाची छेड काढण्यास सुरुवात केली. आरोपी युवक सतत बाइक ओव्हरटेक करीत होते. त्याच दरम्यान या मुलांपासून वाचवण्याच्या नादात सुदीक्षाने अचानक गाडीला ब्रेक लावला आणि गाडी घसरली. यात सुदीक्षाचा जागीच मृत्यू झाला.

Related Articles

Back to top button