मराठी

राज्यभरात कोरोनाचे ३ लाख रूग्ण बरे होऊन गेले घरी

१ लाख ४७ हजार ५१३ रुग्णांवर उपचार सुरू

  • आरोग्यमंत्री राजेश टोपे ने दिली माहिती

मुंबई/दि.१२-  राज्यात आज पुन्हा आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येने 13 हजार 408 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात कोरोनाचे एकूण 3 लाख 81 हजार 843 रुग्ण बरे झाले आहेत. आज देखील नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. आज  12 हजार 712 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण 69.64 टक्के  एवढे आहे. सध्या 1 लाख 47  हजार 513  रुग्णांवर (एक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली. मुंबईत एकूण 1 लाख 26 हजार 356 रुग्ण आहेत तर 1 लाख 69 रुग्ण उपचारामुळे घरी परतले आहेत. आतापर्यंत शहरात 6 हजार 943 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज निदान झालेले 12,712 नवीन रुग्ण आणि नोंद झालेले 344 मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू)
मुंबई मनपा-1132 (50), ठाणे- 229 (1), ठाणे मनपा-220 (0),नवी मुंबई मनपा-432 (3), कल्याण डोंबिवली मनपा-386 (15),उल्हासनगर मनपा-29 (2), भिवंडी निजामपूर मनपा-20 (1), मीरा भाईंदर मनपा-145 (11), पालघर-249 (9), वसई-विरार मनपा-214 (4), रायगड-221 (3), पनवेल मनपा-193, नाशिक-272 (8), नाशिक मनपा-816 (18), मालेगाव मनपा-44 (2),अहमदनगर-338 (3),अहमदनगर मनपा-295 (3), धुळे-37 (2), धुळे मनपा-53 (1), जळगाव-353 (11), जळगाव मनपा-63 (5), नंदूरबार-35 (4), पुणे- 369 (11), पुणे मनपा-1665 (19), पिंपरी चिंचवड मनपा-948 (11), सोलापूर-320 (8), सोलापूर मनपा-60 (3), सातारा-270 (8), कोल्हापूर-396 (17), कोल्हापूर मनपा-238 (2), सांगली-88 (4), सांगली मिरज कुपवाड मनपा-93 (10), सिंधुदूर्ग-30, रत्नागिरी-81 (2), औरंगाबाद-213 (2), औरंगाबाद मनपा-116 (1), जालना-96 (3), हिंगोली-27 (1), परभणी-17 (3), परभणी मनपा-39 (4), लातूर-166 (10), लातूर मनपा-77 (6), उस्मानाबाद-121 (7), बीड-94 (2), नांदेड-109 (5), नांदेड मनपा-25 (5), अकोला-13 (1), अकोला मनपा-31 (1),अमरावती-41 (1), अमरावती मनपा-63 (3), यवतमाळ-139 (1), बुलढाणा-54 (1), वाशिम-37 (1), नागपूर-318 (5), नागपूर मनपा-454 (24), वर्धा-11, भंडारा-18 (1), गोंदिया-27 (2), चंद्रपूर-36, चंद्रपूर मनपा-9 (1), गडचिरोली-13, इतर राज्य 14 (2).आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 29 लाख 8 हजार 887 नमुन्यांपैकी 5 लाख 48 हजार 313 नमुने पॉझिटिव्ह (18.84 टक्के) आले आहेत. राज्यात 10 लाख 15 हजार 115 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 35 हजार 880 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 344 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.4 टक्के एवढा आहे.
एकूण बाधीत रुग्ण-(5,48,313) बरे झालेले रुग्ण-(3,81,843),मृत्यू- (18,650), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(307),?क्टीव्ह रुग्ण-(1,47,513) आहे.

Back to top button