यवतमाळ/दि. १९ – जिल्ह्यात गत 24 तासात 176 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली असून तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 66 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 66 वर्षीय महिला, तालुक्यातील 62 वर्षीय पुरुष आणि वणी शहरातील 54 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 176 जणांमध्ये 110 पुरुष व 66 महिला आहे. यात आर्णी शहरातील सात पुरुष व चार महिला, बाभुळगाव शहरातील एक पुरुष व दोन महिला, दिग्रस शहरातील दोन पुरुष व तीन महिला, कळंब शहरातील चार पुरुष व चार महिला, महागाव शहरातील दोन पुरुष, नेर शहरातील आठ पुरुष व तीन महिला, पांढरकवडा शहरातील 13 पुरुष व आठ महिला, पुसद शहरातील 15 पुरुष व पाच महिला, उमरखेड शहरातील सात पुरुष व तीन महिला, वणी शहरातील 12 पुरुष व 19 महिला, यवतमाळ शहरातील 39 पुरुष व 15 महिलांचा समावेश आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात 1406 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये 326 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 6932 झाली आहे. यापैकी 5005 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 195 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 283 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 66297 नमुने पाठविले असून यापैकी 65170 प्राप्त तर 1127 अप्राप्त आहेत. तसेच 58238 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.