मराठी

तंत्रनिकेतनच्या पदविका अभ्यासक्रम प्रवेशास 4 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

नोंदणीसाठी www.dtemaharastra.gov.in संकेतस्थळ उपलब्ध

अमरावती, दि. 27 : तंत्रनिकेतनच्या पदविका अभ्यासक्रमासाठी राज्यभरात दि. १० ऑगस्ट २०२० पासून ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. दि. २५ ऑगस्ट २०२० पर्यंत  ऑनलाइन फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्राची पडताळणी करण्यात आली आहे. दि. २५ ऑगस्ट २०२० हा पडताळणीसाठी शेवटचा दिवस होता. बऱ्याच विद्यार्थ्याकडून प्रवेश प्रक्रियेस आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता होत नसल्यामुळे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहू शकतात.

या पार्श्वभूमीवर, कुठलाही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून तंत्रशिक्षण संचालनालयाने तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रियेला दि. 4 सप्टेंबर मुदत वाढ दिली आहे. यासंदर्भाचे सूचनापत्र तंत्रशिक्षण संचालनालयाने 25 ऑगस्टला सर्व तंत्रशिक्षण संस्थांना जारी केले आहे.

त्यामुळे ज्या विद्यर्थ्यांनी अद्यापपर्यंत प्रवेश प्रक्रियेकरिता नोंदणी (registration) केलेली नसेल त्यांनी संचालनालयांच्या संकेतस्तळावर www.dtemaharastra.gov.in नोंदणी (registration) करावे. तसेच अश्या विद्यार्थ्यांनी दि. ०४ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन प्रवेश अर्ज भरून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी. त्यानंतर तात्पुरती गुणवत्ता यादी दि. ०७ सप्टेंबर रोजी संचालनालयांच्या संकेतस्तळावर www.dtemaharastra.gov.in  प्रदर्शित करण्यात येईल.

दि. ०८ सप्टेंबर ते १० सप्टेंबर या कालावधी दरम्यान सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये तक्रार किंवा त्रुटी असल्यास त्याची पूर्तता करता येईल. अंतिम गुणवत्ता यादी दि. १२ सप्टेंबर २०२० रोजी संचालनालयांच्या संकेतस्तळावर (www.dtemaharastra.gov.in)  प्रदर्शित करण्यात येईल.

त्यामुळे इयत्ता दहावी उतीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांना या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतन, अमरावतीचे प्राचार्य डॉ.आर.पी.मोगरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

Related Articles

Back to top button