मराठी

पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश उद्यापासून सुरू होणार

डिप्लोमा प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोमवार पासून

मुंबई दि . ८ – बारावीनंतरच्या पदविका औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय व्यवस्था तंत्रज्ञान, सरफेस कोटिंग तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक तंत्रशिक्षण विभागाने आज प्रसिद्ध केले. पदविका अर्थात डिप्लोमा प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोमवार (ता. १०) पासून सुरू होणार आहेत. शनिवारी तंत्रशिक्षण विभागाने तंत्रनिकेतनप्रवेशाबरोबरच अन्य पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. हे प्रवेश १० ते २५ ऑगस्ट या कालावधीत होतील.

Back to top button