नवीदिल्ली दी २ – टेलीकॉम कंपन्यांना आता अॅडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू (AGR)ची रक्कम फेडण्यासाठी दहा वर्षांची मुदत मिळाली आहे. ही मुदत एक एप्रिल 2021 पासून सुरू होईल. आतापर्यंत टेलीकॉम कंपन्या यासाठी 15 वर्षांची वेळ मागत होत्या. यादरम्यान पैसे भरण्यास उशीर झाला किंवा हप्ता थकला, री व्याज आणि दंड भरावा लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, एजीआरच्या एकूण रकमेच्या दहा टक्के रक्कम 31 मार्च 2021 पर्यंत भरावी लागेल.
दरवर्षी सात फेब्रुवारीला टेलीकॉम कंपन्यांना (Telecom companies) एजीआरच्या ठरलेली रक्कम भरावी लागेल. या रकमेचे मूल्यांकन किंवा परतविचार केला जाणार नाही. म्हणजेच, जी आज रक्कम ठरली आहे, तीच भरावी लागेल. यापूर्वी सरकार टेलीकॉम कंपन्यांना एजीआरची रक्कम फेडण्यासाठी 20 वर्षांची मुदत देण्याबाबत विचार करत होते. एजीआरची सर्वात जास्त बाकी वोडाफोन(Vodafone) -आयडियावर (Idea) आहे. वोडाफोन आयडियावर एजीआरची एकूण 50 हजार 400 कोटींची बाकी आहे. तसेच, भारती एअरटेलवर 26 हजार कोटी रुपयांची बाकी आहे.