मराठी

शहर सुधार समिती सभापतीपदी अजय गोंडाणे व उपसभापतीपदी सुचिता बिरे विराजमान

अमरावती/दि.२५  – अमरावती महानगरपालिका अंतर्गत समितीच्‍या नवनिर्वाचित शहर सुधार समिती सभापतीपदी श्री.अजय गोंडाणे व उपसभापतीपदी सौ.सुचिता बिरे यांनी आज दिनांक 25 सप्‍टेंबर,2020 रोजी पदाचा पदभार मावळत्‍या सभापती व उपसभापती यांचेकडुन स्विकारला. सदर पदग्रहण समारंभाकरिता उपमहापौर कुसुम साहु, स्‍थायी समिती सभापती राधा कुरील, सभागृह नेता सुनिल काळे, भाजपा शहर अध्‍यक्ष किरण पातुरकर, झोन क्र.1 चे सभापती संजय वानरे, महिला बाल कल्‍याण समिती सभापती सुनंदा खरड, नगरसेविका संध्‍या टिकले, वंदना मडघे, नगरसेवक अजय सारसकर, आशिष अतकरे, गजानन देशमुख, लता देशमुख, प्रमोद राऊत, सुनिल जावरे यांनी शुभेच्‍छा दिल्‍या.
मावळते शहर सुधार समिती सभापती अजय सारसकर यांच्‍याकडुन शहर सुधार समिती सभापती अजय गोंडाणे यांनी आज पदभार स्विकारुन कामाकाजाला सुरुवात केली. यावेळी सभापती अजय गोंडाणे यांनी सांगितले की, त्‍यांना दिलेल्‍या कार्यास योग्‍य न्‍याय देण्‍यात येईल व दिलेली जबाबदारी यशस्‍वीरित्‍या पार पाडण्‍यात येईल.

Related Articles

Back to top button