मराठी

पवित्र “दीक्षाभूमी”नागपूर येथील 64 व्या “धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे” सर्व कार्यक्रम रद्द

पत्रकार परिषद मध्ये दिली माहिती

नागपूर/दि.१३ –  कोविड -19 च्या वाढत्या प्रादूर्भावामुळे  धम्मपरिषद व मुख्य धम्मसोहळा  रद्द करण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या विद्यमाने  नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी वरील 64 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे सर्व कार्यक्रम रदद करण्यात येत आहे.दरवर्षी प्रमाणे पंचशील ध्वजारोहण व बुद्दवंदना साधेपणाने घेण्यात येतील.
      दिनांक 14 आँक्टोबर 1956,अशोक विजयादशमी दिनी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दीक्षाभूमीवर सकाळी 9.00 वाजता पूज्य महास्थवीर चंद्रमणी यांचेकडून त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली. दीक्षाभूमीवर पूज्य भदंत आर्य नागार्जुन सुर ई ससाई अध्यक्ष,प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, यांचे आणि स्मारक समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत बुद्दवंदना घेण्यात येईल. याचवेळी सर्व बुद्ध विहारात बुद्ध वंदना घेण्यात यावी. अशी बौद्ध जनतेला स्मारक समितीतर्फे जाहीर विनंती स्मारक समितीचे अध्यक्ष सुधिर फुलझेले यांनी पत्रपरिषदेच्या माध्यमातून जाहीर विनंती केली आहे.
       स्मारक समितीचे अध्यक्ष सुधिर फुलझेले बौद्ध बांधवांना   आव्हान करत असे म्हणाले की,दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा कोविड-19 मुळे साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असून प्रत्येकाने आप आपल्या घरीच सकाळी 9.00  वाजता बुद्धवंदना घेवून साजरा करावा व बाबासाहेबांना आभिवादन करावे असे ही ते म्हणाले.
       यावर्षी कोविड-19 मुळे पडलेल्या नागरिकांना, डॉक्टरांना, स्वास्थ्य कर्मचाऱ्यांना, पोलिसांना सफाई कर्मचाऱ्यांना व कोरोना योद्धांना श्रद्धांजली प्रित्यर्थ व त्यांच्या कुटुंबातील दु:खात सामिल होण्याच्या भावनेतून दीक्षाभूमी स्तुपावर कुठलीही रोषनाई न करण्याचा स्मारक समितीने निर्णय घेतला आहे. पत्रपरिषदेत उपस्थित अध्यक्ष भन्ते आर्य नागार्जुन सुर ई ससाई, विलास गजघाटे इ.होते.
Back to top button