मराठी

नव्याने प्राप्त सर्व लस ज्येष्ठांना दुसऱ्या मात्रेसाठी वापरणार

डॉ. दिलीप रणमले यांची माहिती

अमरावती, दि.११ : पहिला डोस घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांना निश्चित वेळेनुसार दुसरा डोस प्राप्त होणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन आजमितीला उपलब्ध लस पाहता सध्या केवळ ज्येष्ठांच्या दुसऱ्या मात्रेचे लसीकरण होणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली.
डॉ. रणमले म्हणाले की, लसीकरणात उपलब्ध साठ्यानुसार ज्येष्ठांना प्राधान्य देण्याची शासनाची सूचना आहे. त्यानुसार सध्या उपलब्ध असलेली सर्व लस ज्येष्ठांच्या दुसऱ्या मात्रेसाठी वापरण्यात येईल. वय 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पुढील आदेश होइपर्यंत स्थगित राहणार आहे, अशी माहिती डॉ. रणमले यांनी दिली.

 

Back to top button