मराठी

लोकसेवा आयोगाच्या सर्वच परीक्षा पुढे ढकल्या जाणार

सूंत्रानी दिली माहिती

पुणे/दि.२९– राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा घेतलेल्या निर्णयाची आयोगाला काहीच माहिती नव्हती. तो अचानक घेतलेला निर्णय आहे. राज्य सरकारचा कोणताही पत्रव्यवहार आयोगाशी झाला नाही किंवा परीक्षा पुढे ढकलण्याबाबत पत्र देखील आलेले नाही. त्यामुळे आयोगाने अद्यापपर्यत संकेतस्थळावर घोषणा केलेली नसली तरी आयोग शासनाच्या विरोधात जाणार नाही. त्यामुळे परीक्षा पुढेच ढकलल्या जाणार आहेत असे महाराष्ट्र लोकसेेवा आयोगातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करण्याची आवश्यकता नसून परीक्षा पुढे ढकलली जाणार हे गृहीत धरून तयारी करावी.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीकडून (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटरवरून देण्यात आली होती. यावर आयोगाने कोणतीही अधिकृत माहिती संकेतस्थळावरून दिली नसल्याने परीक्षार्थी संभ्रमात आहेत. आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांबाबत सर्वतोपरी निर्णय घेण्याचा अधिकार आयोगाला आहे असे असताना मुख्यमंत्र्यांनी निर्णय जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयाबद्दल अधिकृत घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर न झाल्याने परीक्षा पुढे ढकली जाणार की नाही. तसेच परीक्षेच्या पुढील तारखांबाबत आयोगाने अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. यामुळे परीक्षार्थींमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. यूपीएससीची परीक्षा नियोजित तारखेला 4 ऑक्टोबरला होणार आहेत. तसेच जेईई आणि नीट परीक्षा घेण्याबाबत न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यामुळे याही परीक्षा होणार आहेत. एमपीएससीची परीक्षा 13 वरून 20 सप्टेंबर ला होईलच या आशेने परीक्षार्थी गाव सोडून जीवावर उदार होऊन शहरात आले. आयोगाने परीक्षा घेण्याची सर्व तयारी दर्शीविली असताना मुख्यमंत्र्यांनी एकतर्फी निर्णय देऊन विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे असे मत विद्यार्थ्यांचे आहे.

Related Articles

Back to top button