मराठी

मार्चपर्यंत सर्व रेल्वे सुरू होणार

नवी दिल्ली दि २५– देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली असली, तरी बहुतांश रेल्वे गाड्या अजून बंद आहेत. मोठ्या मार्गावर विशेष गाड्या धावत आहेत; परंतु लोकांना दुप्पट भाडे द्यावे लागत आहे. रेल्वे मंत्रालयाला अशी अपेक्षा आहे, की सर्व मेल-एयस्प्रेस गाड्या मार्चपर्यंत सुरू होतील. रेल्वेगाड्या नियमित मार्गावर आणण्याची तयारी रेल्वेकडून केली जात आहे.
देशात कोरोना संक्रमणापूर्वी जवळपास 12 हजार प्रवासी गाड्या धावत होत्या. रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आता मेल-एयस्प्रेसच्या 1700 पैकी 1100 पेक्षा जास्त गाड्या धावत आहेत. पाच तेसहा हजार उपनगरी गाड्यांपैकी 90 टक्केगाड्या धावत आहेत. सुमारेसाडेतीन हजार आंतरराज्य गाड्या आहेत, त्यापैकी केवळ 300 गाड्या धावतात. रेल्वेमंत्रालयाच्या म्हणण्यानुसार मार्चपर्यंत सर्व मेल-एयस्प्रेस गाड्या चालवण्याचा प्रयत्न आहे. केंद्रीय आरोग्य व गृह मंत्रालय कोविडच्या स्थितीचा आढावा घेऊन रेल्वे मंत्रालयाला अहवाल देईल. राज्यांमध्येपरस्पर संमतीच्या आधारेअधिक आंतरराज्यीय गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात येईल. महाराष्ट्रआणि केरळ वगळता इतर सर्वराज्यांत कोरेना आता नियंत्रणात आहे. त्यामुळे येत्या महिन्यापासून गाड्यांची संख्या वाढण्यास सुरुवात होईल, असा विडास आहे.
यापूर्वी पश्चिम मध्य रेल्वे क्षेत्राच्या मार्गावर 608 मेल-एयस्प्रेस आणि प्रवासी गाड्या होत्या. सद्यस्थितीत तीन विभागात केवळ 162 कार्यरत आहेत. गोरखपूर, लखनऊ, वाराणसी मार्गावर भाडेसामान्य आहे. उत्सवाच्या विशेष आणि इतर मार्गांवर धावणा-या गाड्यांमध्ये लांब प्यासाठी 200 ते800 रुपयांचा अतिरिक्त शुल्क आहे. महाराष्ट्रात अगदी कमी अंतरासाठीसुद्धा दुप्पट भाडे द्यावे लागत आहे. पूर्वी वेगवेगळ्या झोनमधून 2,226 गाड्या धावत होत्या, आता 1745 गाड्या सुरू आहेत. भुसावळ-मुंबईसारख्या व्यस्त मार्गावर भाडे दुप्पटीहून अधिक आहे. या मार्गावरील प्रवासी भाडे पॅसेंजरसाठी 85 रुपये, एयसप्रेस गाड्यांसाठी तीनशेरुपयेआणि फेस्टिव्हल ट्रेनसाठी आठशे रुपये भाडे आहे. प्रवासी आणि लोकल गाड्या सुरू करण्याबाबत राज्यानेशिफारस पाठविली आहे. राज्य परिवहनच्या 16 हजार बसेसपैकी 13 हजार बस आता कार्यरत आहेत.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये 343 पैकी फक्त 96 गाड्या धावत आहेत. पश्चिम मध्य रेल्वेच्या कोटा विभागातून दररोज 65 मेल-एयस्प्रेस गाड्या धावतात. त्यांच्यात एकही प्रवासी ट्रेन नाही. मथुरा-नागदा हा सर्वात व्यस्त मार्ग आहे. जयपूर-मुंबई दरम्यानच्या विशेष गाड्यांमध्ये लोकांना दुप्पट भाडे द्यावे लागत आहे.

Related Articles

Back to top button