मराठी

वाजंत्री व डिजे समुहाला व्यवसाय करण्याची परवानगी द्या

अन्यथा ब्रिक्स मानवाधिकार मिशनचा आमरण उपोषणाचा इशारा

वरुड दी २६– वाजंत्री व डिजे वाजविणा:या समुहाला रितसर परवानी देण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन ब्रिक्स मानवाधिकार मिशनच्या वतीने मोर्शी येथील उपविभागीय कार्यालयाला देण्यात आले.
या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, भारत देशामध्ये गेल्या ६ महिन्यापासुन लॉकडाऊन सुरु आहे. अशा परिस्थितीमध्ये संपुर्ण व्यवसायांना हळुहळु व्यवसाय सुरु करण्याच्या परवानग्या देण्यात आल्या नाही. ही मंडळी आपली वाजंत्री व्यवसाय विकसित करण्याकरिता सिजनमध्ये तालीम करीत असतात व वर्षातील ६ महिने व्यवसाय करीत असतात. अशा परिस्थितीमध्ये ही मंडळी मरण पत्करेल; परंतु दुसरा व्यवसाय स्विकारणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शसनाने येणा:या दुर्गा व लक्ष्मीच्या स्थापनेपुर्वी संबंधित वाजंत्री वाजविणा:या व डिजे वाजविणा:यांना परवानगी देवुन उपजिवीकेचे साधन उपलब्ध करुन द्यावे, अन्यथा ब्रिक्स मानवाधिकार मिशन व सर्व पदाधिकारी यांनी मोर्शी येथील उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
निवेदन देतेवेळी ब्रिक्स मानवाधिकार मिशनचे पवन देशमुख, अण्णा भोंगाडे, रमाकांत गावंडे, राजेंद्र घाटोळे, रवि गहलोद, गणेश कुसराम तसेच साहित्य सम्राट लोकशाही अण्णा साठे, लोणी येथील युवामंचचे प्रल्हाद खडसे, अविनाश फुटाणे, राकेश खडसे, पंकज देवघरे, विजय तायवाडे उपस्थित होते.

Related Articles

Back to top button