-
तेली समाज संघटनेचा पदग्रहण सोहळा
नांदगांव पेठ/दि.२२ – स्पर्धात्मक युगात आपली पिढी अधिक सक्षम व्हावी, ज्ञानी व्हावी यासाठी आपण ज्ञान, विज्ञानाचे धडे पिढीला देतो त्याच अनुषंगाने संस्काराचे बाळकडू देणे सुद्धा आवश्यक असून संस्कारक्षम पिढी घडली तर चांगला समाज निर्माण होईल असे प्रतिपादन माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता यांनी नांदगांव पेठ येथे आयोजित अखिल तेली समाज संघटनेच्या पदग्रहण सोहळ्याच्या कार्यक्रमप्रसंगी केले.ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले होते.
अखिल तेली समाज संघटन वर वधू सूचक मंडळाचे अमरावती जिल्हाध्यक्ष किशोर साखरवाडे यांच्या नेतृत्वात आयोजित कार्यकारिणी पदाग्रहण सोहळा व कार्यकर्ता परिचय मेळावा स्थानिक संगमेश्वर देवस्थान येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले होते तर प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे अध्यक्ष दिलीप चव्हाण,सचिन देशमाने,गणेश भिसे,अजित गवळी,अरुण धांडे,राजेश कारमोरे,राहुल भिसे, रवी गुल्हाने,राजू हजारे,उमेश शिरभाते,जयंत ढोले,प्रभूदास फंदे,विवेक गुल्हाने, संजय आसोले,माजी जी प सदस्य नितीन हटवार प्रामुख्याने लाभले होते.

संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस हारार्पण व पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ आणि संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
जिल्हा व तालुका कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले.किशोर साखरवाडे यांनी आपल्या प्रस्ताविकेमध्ये संघटनेची माहिती देऊन अहंकार सोडा समाज जोडा असा मार्मिक सल्ला समाजबांधवांना दिला. अत्यंत कमी वेळेत नियोजनबद्ध कार्यक्रम पार पाडल्यामुळे जगदीश गुप्ता यांचे सह मान्यवरांनी जिल्हाध्यक्ष किशोर साखरवाडे यांचे कौतुक केले.
कोविड मुळे शासनाचे नियम पाळून सामाजिक अंतर राखून हा कार्यक्रम पार पडला यावेळी पराग भस्मे, कैलास फंदे,दिलीप हटवार, नंदा साठवणे, देवल फंटिंग, शेषराव देउळकर,रमेश साकोरे,सुनील बावनकर,रामविलास बडवाईक,कैलास हजारे, आशिष हटवार,मोहित राजगुरे, जयंत निखाडे, राजेंद्र भुरे, श्रीकृष्ण साकोरे, सुनील धर्माळे,मनोज हटवार, विजय शिरभाते, अमोल हटवार सुनील ढोले ,मुरलीधर मदनकर, सविता मसदकर, शोभा पाटील, जितेंद्र ठोंबरे,अमोल निमकर, वैभव बावनकुळे, अलका धांडे,प्रभा फंदे, प्रफुल्ल थोटे, दीपक सायरे, प्रतिभा ,भेलाऊ, सतीश हटवार, मंगेश हटवार, संतोष गडेकर ,गजानन साखरवाडे ,प्रवीण गिरपुंजे, भारत वंजारी, शिवा साठवणे यांचेसह संपूर्ण राज्यातील समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्वरी साखरवाडे,वैष्णवी वंजारी हिने केले तर आभार प्रदर्शन सुनील ढोले यांनी मानले.