सुपरस्पेशालिटीसाठी आयटीआयतुन सांस्कृतिक भवनापर्यंत पर्यायी मार्ग
जिल्हा वार्षिक नियोजनातून ४५ लक्ष ५६ हजाराच्या खर्चास मिळाली
अमरावती दि . १५ सप्टेंबर : दुर्धर आजार व जटिल शल्यक्रिया अशा उपचारासाठी वरदान ठरलेल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती अर्थात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कडे जाणाऱ्या मुख्य प्रवेश मार्गात लवकरच मोठा बदल होणार आहे . रुग्णालयात वाढता रुग्णसेवेचा व्याप लक्षात घेता सद्यास्थित डफरीन रुग्णालय परिसरातून जाणारा मुख्य मार्ग अपुरा व अडगळीच्या ठरत असल्याने आता थेट औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरातून मोर्शी रोड पर्यंतच्या रस्त्याला विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावतीचा रस्ता जोडल्या जाणार आहे.
सदर बाबीला घेऊन अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न फळास आले आहे .सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ते मोर्शी रोड पर्यंतचा मुख्य मार्ग व्हाया औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरातून काढण्यात येण्याच्या कामाला जिल्हा वार्षिक नियोजनातून ४५ लक्ष ५६ हजार रुपये इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे . याबाबतचे पत्र जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती द्वारे दिनांक ८ सप्टेंबर २०२० रोजी जारी करण्यात आले आहे .
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालय येथील आरोग्य सुविधांचा आढावा घेण्याबाबत अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी गेल्या १६ जानेवारी २०२० रोजी बैठक बोलावली होती . या बैठकीत सुपर स्पेशालिटीच्या मुख्य प्रवेशासाठी निवासी जिल्हाधिकारी याचे निवास स्थाना जवळून तसेच लॉ कॉलेज च्या जवळून रस्ता मिळाला तर रुग्णांना होणारा त्रास कमी करता येईल अशी भूमिका आ. सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केली होती . दरम्यान बैठकीत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे सह संचालक श्री .उमाळे यांना पाचारण केले असता त्यांनी सुपर स्पेशालिटी साठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरातुन अप्रोच रस्ता काढण्याबाबत सकारात्मकता दर्शविली होती. अशातच मागील १६ जुलै २०२० रोजी झालेल्या रुग्ण कल्याण नियामक समितीच्या सभेतही आ. सुलभाताई खोडके यांनी हा मुद्दा उपस्थित केला असता रुग्ण कल्याण नियामक समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी याबाबत आमसहमती दर्शवून ठराव मंजूर केला . तसेच सदर कामासाठी निधीची अडचण उद्भवल्यास आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आ. सुलभाताईंनी बैठकीत आश्वासित केले. दरम्यान सुपर स्पेशालिटी च्या फेज दोन च्या इमारती मध्ये सद्या जिल्हा कोविड रुग्णालय स्थापन करण्यात आले आहे . त्यामुळे covid-19 च्या उपचाराकरिता येथे मेडिकल ऑक्सिजन लिक्विड प्लॅन विथ टर्न की , उभारण्याकरिता रस्त्या अभावी अडचणी निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेता पर्यायी रस्ता बांधकामाबाबत आमदार महोदयांच्या सूचनेवरून आरोग्य प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे तसा प्रस्ताव पाठविला होता. दरम्यान आ. सुलभाताई खोडके यांनी सुपर स्पेशॅलिटीच्या पर्यायी रस्त्याबाबत बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एन. प्रकाश रेड्डी यांना प्रत्यक्ष पाहणी करण्याबाबत सुचना केली असता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पासून थेट शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरातून मोर्शी रोड पर्यंत हा रस्ता साकारण्या बाबत त्यांनी सर्वेक्षण पूर्ण केले . तदनंतर आ. सुलभाताई खोडके यांनी यासंदर्भात असलेला रस्त्याचे कृती आराखडासह , नकाशा त्वरित तयार करण्याबाबत आदेशित केले होते . दरम्यान जिल्हाधिकारी महोदय यांचे कार्यालयातून सदर प्रस्ताव शासनाकडे सादर झाला असता शासनाकडून मंजुरी मिळण्याकरिता आमदार सुलभाताई खोडके यांचे वतीने प्रशासन स्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू होता. सद्या कोरोना महामारीकाळात सुपर स्पेशालिटीवर रुग्णसेवेचा भार पडत असतांना आरोग्य सेवा गतिमान करण्यात पर्याप्त रस्त्याअभावी अडचणी येत आहे, येथे येणाऱ्या रुग्ण व त्यांचे नातेवाईक तसेच आरोग्य सेवेतील विविध यंत्रणा यांच्या सोयीसाठी पर्यायी रस्त्याकरिता जागा मिळण्याबाबत सदर प्रस्तावाचा गांभीर्यपूर्वक विचार करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी याकरिता आमदार सुलभाताई खोडके यांनी संबधित विभागांना सूचना केल्या. या मागणीच्या अनुषंगाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ते मोर्शी रोड पर्यंतचा मुख्य मार्ग व्हाया औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरातून काढण्यात येण्याच्या कामाला जिल्हा वार्षिक नियोजनातून ४५ लक्ष ५६ हजार इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील हॉल मध्ये १०० खाटांचे कोवीड रुग्णालय सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी हालचाली सुरु केल्या आहे. त्यामुळे सदर रस्ता हा आय टी आय मधील कोविड १९ सेंटर करीता अवागमनासाठी उपयुक्त ठरणार आहे .