मराठी

रिलायन्स रिटेलमधील हिस्सा अ‍ॅमेझॉन खरेदी करणार

२० अब्ज डॉलर्सचे भागभांडवल

मुंबई/दि. १० – मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज(RELIANCE) लि. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड या दिग्गज ई-कॉमर्स कंपन्या अ‍ॅमेझॉनला(AMAZON) २० अब्ज डॉलर्सचे भागभांडवल विकणार आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार रिलायन्स इंडस्ट्रीजने मेझॉनला त्याच्या रिलायन्स रिटेल व्यवसायात ४० टक्के हिस्सा खरेदी करण्याची ऑ‘र दिली आहे. म्हणजेच, जर हा करार झाला तर रिलायन्स मेझॉनला ४० टक्के किरकोळ व्यवसाय देऊ शकेल. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडमध्ये अ‍ॅलमेझॉन इंकने रस दाखविला आहे. रिलायन्सच्या या निर्णयामुळे त्याचा शेअर २०८९.९० रुपयांच्या अखेरच्या उच्चांकी पातळीवर गेला. बुधवारी अमेरिकन कंपनी सिल्व्हर लेक पार्टनर्सने रिलायन्स रिटेलमध्ये साडेसात हजार कोटींची गुंतवणूक जाहीर केली. यापूर्वी सिल्व्हर लेकने रिलायन्सची टेक कंपनी जिओ प्लॅटफॉर्ममध्येही गुंतवणूक केली. रिलायन्सने एप्रिलपासून जिओसाठी कित्येक गुंतवणूकदारांकडून सुमारे २० डॉलर्स जमा केले आहेत. या गुंतवणूकदारांमध्ये गूगल आणि फेसबुकसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. तेल ते टेलिकॉम व्यवसायाचा सौदा करणारे रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष मुकेश अंबानी(MUKESH AMBANI) भारतात किरकोळ व्यवसायात प्रवेश करण्याची तयारी करत आहेत. अंबानी या विस्तारासाठी संभाव्य गुंतवणूकदार शोधत आहेत. अमेरिकेतील रिटेल दिग्गज वॉलमार्ट इंकसुद्धा रिलायन्स रिटेलमधील हिस्सा खरेदी करण्यासाठी चर्चेत असल्याचा दावा नुकत्याच झालेल्या एका मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. वॉलमार्ट इंकने २०१८ मध्ये भारताची आघाडीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टदेखील खरेदी केली. रिलायन्स रिटेल आणि फ्यूचर ग्रुपने २४ हजार ७१३ कोटींचा व्यवहार केला. रिलायन्स इंडस्ट्रीजची सहाय्यक कंपनी रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेड (RRVL) फ्यूचर समूहाचा रिटेल आणि घाऊक व्यवसाय आणि रसद व गोदाम व्यवसाय घेणार आहे. यामुळे रिलायन्सला देशातील ४२० शहरांमध्ये पसरलेल्या फ्यूचर ग्रुपच्या बिग बाजार, ईजीडे आणि ए‘बीबीच्या १,८०० स्टोअरमध्ये पोहोचण्याची सुविधा मिळणार आहे.

Related Articles

Back to top button