मुंबई/दि. ३ – अडचणीत सापडलेल्या व्होडाफोन(VODAFONE) आयडियासाठी(IDEA) दिलासादायक बातमी आहे. अॅमेझॉन(AMAZON) डॉट कॉम आणि व्हेरिजॉन कम्युनिकेशन्स व्होडाफोन आयडियामध्ये २९ हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक करू शकतात. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने अॅपडजस्ट ग्रॉस रेव्हेन्यू (AGR) प्रकरणात दिलेला आदेश लक्षात घेतला, तर ही गुंतवणूक फायद्याची ठरेल. यापूर्वीया दोन्ही कंपन्यांतील भांडवल गुंतवणूक करण्यास बंदी घालण्यात आली होती. आता दहा वर्षांत एजीआर भरण्याची मुदत दिल्याने आणि भांडवली गुंतवणूक करण्यास मान्यता दिल्याने आयडिया-व्होडाफोनने सुटकेचा निश्वास टाकला आहे. ई-कॉमर्स दिग्गज अॅयमेझॉन.इन आणि वेरिझन कम्युनिकेशन्स भारतात दूरसंचार कंपनी व्होडाफोन- आयडिया कंपनीचा काही हिस्सा खरेदी करू शकतात. व्होडाफोन – आयडियामध्ये दोन्ही कंपन्या सुमारे २९ हजार कोटींची गुंतवणूक करू शकतात. कंपनीवा एजीआरचे थकीत ५०,४४० कोटी रुपये भरायचे आहेत. कंपनीने आतापर्यंत सात हजार ८५४ कोटी रुपये भरले आहेत. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एजीआर प्रकरणाची सुनावणी करताना दूरसंचार कंपन्यांना एजीआर थकबाकी भरण्यासाठी दहा वर्षांची मुदत दिली. दूरसंचार कंपन्यांवरील एकूण थकीत रक्कम एक लाख चार हजार कोटी रुपये आहे. आता कंपन्यांना ३१ मार्च २०२१ पर्यंत दहा टक्के एजीआर थकबाकी भरावी लागेल. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे, की न्यायालयाने प्रस्तावित पेमेंट पॅटर्न इतर कंपन्यांच्या तुलनेत व्होडाफोन आयडियासाठी अडचणी वाढवेल.
त्यामुळे कंपनीच्या रोख प्रवाहावर दबाव निर्माण होईल. अशा परिस्थितीत एजीआर पेमेंट्स आणि नेटवर्क डेव्हलपमेंट तसेच इतर सुधारणांसाठी पैसे भरण्यासाठी कंपनीची भागभांडवल विक्री करून कंपनी निधी गोळा करेल. कंपनीच्या संचालक मंडळाची उद्या बैठक घेणार आहे, ज्याचा मुख्य मुद्दा निधी उभारणीचा असू शकेल. वास्तविक, एजीआरच्या थकबाकीमुळे न्यायालयाने कंपनीवरील हिस्सेदारी विक्री करण्यासारखी ही कारवाई थांबविली होती. मेझॉनने भारतात आधीच काही कंपन्यांत गुंतवणूक केली आहे. ई-कॉमर्स बाजारासह इतर व्यवसायातही कंपनीची भक्कम पकड आहे, तर व्हेरिजॉन कम्युनिकेशन्सने यापूर्वी भारती एअरटेल लिमिटेडबरोबर भागीदारी केली आहे. २०१९ मध्ये या कंपनीने भारती एअरटेलबरोबर भागीदारी केली आणि जुलैमध्ये व्यावसायिक ग्राहकांसाठी ब्लू गेन्स या नावाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेवा सुरू केली.
स्पर्धेमुळे दबाव
वर्षाच्या सुरुवातीस अशी बातमी आली होती, की गूगल व्होडाफोनचे पाच टक्के भागभांडवल खरेदी करू शकेल; परंतु नंतर ‘गूगल‘ने रिलायन्स जिओमध्ये ३३ हजार कोटींची गुंतवणूक केली. या करारावर तज्ज्ञांचे म्हणणे होते की जिओ-फेसबुक-गूगल करारामुळे अन्य स्पर्धक टेलिकॉम कंपन्यांवर समान भागीदारीसाठी दबाव निर्माण होईल. टेलिकॉम नियामक ट्रायच्या म्हणण्यानुसार, मेमध्ये व्होडाफोन आयडियाने ४७ लाख ग्राहक कमी केले आहेत, तर रिलायन्स जिओने मेमध्ये ३७ लाख ग्राहक जोडले आहेत.