मराठी

फ्युचर ग्रुपला मदतीस अ‍ॅमेझान तयार

रिलायन्सशी झालेला करार तोडण्याची घातली अट

मुंबई/दि.२३  – रिलायन्स इंडस्ट्रिज लि. आणि अ‍ॅमेझॉन यांच्यात सुरू असलेल्या वादाला नवीन वळण मिळाले आहे. आता अ‍ॅमेझॉनने फ्युचर ग्रुपला सशर्त मदतीची तयारी दाखविली आहे. रिलायन्सबरोबरचा करार संपवल्यास कंपनी मजबूत वित्तीय भागीदार किंवा गुंतवणूकदाराकडून गुंतवणूक मिळविण्यात मदत करेल. यापूर्वी मेझॉनने फ्युचर ग्रुपच्या प्रवर्तकांविरुद्ध सिंगापूर आंतरराष्ट्रीय लवाद केंद्रात (SIC) कायदेशीर खटला दाखल केला होता. त्याचा निर्णय पुढच्या आठवड्यात येऊ शकेल. मेझॉनने किशोर बियाणीच्या फ्युचर ग्रुपला मोठे गुंतवणूकदार आणि नवीन सामरिक भागीदारांकडून मोठ्या कर्जाच्या समस्येवर मात करण्यासाठी गुंतवणूक करण्याची तयारी दाखविली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मेझॉन, रिलायन्स इंडस्ट्रिज आणि फ्युचर ग्रुपमधील हा करार अडचणीत आला आहे. मेझॉन आणि फ्लिपकार्ट आघाडीवर असलेल्या भारतातील ऑनलाईन किरकोळ बाजारावर रिलायन्सची नजर आहे. त्याचबरोबर, मेझॉन भारतात ऑनलाईन आणि ऑफलाइन रिटेल व्यवसायामध्ये आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मेझॉनने २०१८ मध्ये खासगी इक्विटी फंड समारा कॅपिटलसह आदित्य बिर्ला समूहाची सुपरमार्केट चैन मिळविली. रिपोट्र्सनुसार, अ‍ॅमेझॉनकडे फ्युचर बाजारच्या बिग बाजार, एफबीबी आणि इतर स्थानिक व्यवसायावर नजर आहे. कारण याद्वारे मेझॉन स्थानिक उत्पादने कमी किंमतीत खरेदीदारांपर्यंत पोहोचवू शकतात. आता अशा परिस्थितीत जर फ्युचर ग्रुप आणि रिलायन्समधील करार पूर्णत्वाला गेला, तर अ‍ॅमेझॉन आणि फ्युचर ग्रुपतील भागीदारीला काही अर्थ राहत नाही. २०१९ मध्ये किरकोळ व्यवसायातील एफडीआय नियमांमुळे अ‍ॅमेझॉनने फ्यूचर ग्रुपमधील मोठा हिस्सा विकला नाही. एफसीपीएलच्या ४९ टक्के भागभांडवलासाठी कंपनीने १,४३० कोटी रुपये दिले आहेत. मागील महिन्यात मेझॉनने फ्युचर ग्रुपच्या प्रवर्तकांना कायदेशीर नोटीस पाठविली होती. त्यात म्हटले आहे, की रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RELIANCE) सोबत केलेल्या करारामुळे विना-स्पर्धात्मक करार नियमांचे उल्लंघन झाले आहे. असे असूनही, मेझॉनला फ्युचर ग्रुपला मदत करायची आहे.

दोन दिवसांत निर्णय

यावर्षी ऑगस्टमध्ये फ्युचर ग्रुपने रिलायन्स, होलसेल, लॉजिस्टिक्स आणि वेअर हाऊस व्यवसायांना रिलायन्सची विक्री केली. यावर अ‍ॅमेझॉनने फ्युचर समूहाच्या प्रवर्तकांविरूद्ध qसगापूर आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र (एसआयएसी) कायदेशीर खटल्याला आक्षेप घेतला. १६ ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली. सुत्रांच्या माहितीनुसार, सुनावणीदरम्यान अ‍ॅमेझॉन, फ्यूचर ग्रुप आणि रिलायन्स या प्रकरणात व्ही.के. qकग सोल लवाद म्हणून होता. व्ही राजा सिंगापूरचा माजी अ‍ॅटर्नी जनरल आहे. ते २६ तारखेला निर्णय देऊ शकतात.

Back to top button