-
रडणारे सरकार असून लढणारे सरकार
नागपूर दि २८ – हिवाळी अधिवेशनही पुढे ढकलण्याचा राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न असल्याचा तसेच या सरकारला राजकीय अल्झायमर (स्मृतिभ्रंश) झाला असल्याचा आरोप माजी वित्तमंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज नागपुरात केला. हे रडणारे सरकार असून लढणारे सरकार राहिले नाही, हे दुर्दैव असल्याचेही ते म्हणाले.
महाविकास आघाडीला सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पाश्र्वभूमीवर त्यांनी तीव्र शब्दात आसूड ओढले. ते म्हणाले की, कोरोनाचा वैगाने फैलाव होऊ शकतो, असे कारण सांगत नागपुरातील हिवाळी अधिवेशन मुंबईतच घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. आता ते सुद्धा पुढे ढकलण्याचा प्रस्ताव आणला जात आहे. वास्तविक अधिवेशन घेणे हे मुख्यमं त्र्यांच्या मर्जीवर असता कामा नये. तर्कसंगत चर्चेसाठी अधिवेशन घेतले पाहिजे. हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्याबाबत १९५३मध्ये करार झाला आहे. पण, या कराराचा भंग करण्यात आला. मुंबईत अधिवेशन झाले तर काही करणार नाही, असे कोरोना विषाणू म्हणाला काय? एकीकडे थिएटयर, मॉल सुरू करता.
वर्षभरात एकदाही विदर्भात एकदाही पाऊल ठेवले नाही. विदर्भात वातावरण गरम असते. पण, हिवाळ्यात ते नसते. हिवाळी अधिवेशन काळात पाय ठेवला तर भाजतील, असे त्यांना वाटते काय? आभासी बैठकही घेतली नाही. पूरग्रस्त गावही आवडते- नावडते. गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली नाही. आर्थिक भेट दिली असती तर धन्यवाद दिले असते. विदर्भाचे पुत्र नाना विधानसभेचे अध्यक्ष आहेत. त्यांनीसुद्धा होकार दिला. अध्यक्षांची खुर्ची उंचावर असते. त्यांनी सरकारला ना ना म्हणायला हवे होते, असे मुनगंटीवार म्हणाले.
विदर्भ विकास महामंडळ स्थापण्याचा प्रस्ताव १९८४ मध्ये दोन्ही सदनात एकमताने संमत झाला होता. त्यातील ३७१/२ कलमात निधीचे वाटप लोकसंख्येच्या अनुपातात केले पाहिजे, असा स्पष्ट उल्लेख आहे. मानव विकास निर्देशांकात विदर्भातील ६० तालुके येतात. एप्रिलमध्ये या महामंडळाची मुदत संपली. पण, एकाचाही आवाज नाही. मुखाच्छादन चुप रहाण्यासाठी नसते, असा टोला त्यांनी सत्ताधाèयांवर हाणला.