मराठी

अमरावती महानगरपालिकेकडुन जागतिक दिव्‍यांग दिवस साजरा

अमरावती दी/३- आज दिनांक ३ डिसेंबर,२०२१ रोजी अमरावती महानगरपालिकेकडुन जागतिक दिव्‍यांग दिवस दरवर्षी प्रमाणे साजरा करण्‍यात आला. सदर कार्यक्रम ई.टी.सी. केंद्र आयसोलेशन दवाखाना, बडनेरा रोड येथे मा.महापौर चेतन गावंडे यांच्‍या अध्‍यक्षतेत साजरा करण्‍यात आला. सदर कार्यक्रम समाज विकास विभाग व शिक्षण विभाग यांच्‍याकडुन आयोजित करुन दिव्‍यांगाकरीता महानगरपालिका द्वारा १०० बॅटरी चलीत सायकल, १५ व्‍हील चेअर, २ रोलेटर व ४ कर्णयंत्र खरेदी करण्‍यात आले असून आज जागतिक दिव्‍यांग दिवसाचे दिवशी दिव्‍यांगांचे दैनंदिन जीवनामध्‍ये उपयोगी साहित्‍य वाटपाची प्रक्रिया सुरु करण्‍यात आली.

सदर कार्यक्रमाचे अध्‍यक्ष महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम साहु, मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे, प्रमुख अतिथी म्‍हणून सभागृह नेता तुषार भारतीय, शिक्षण समिती सभापती आशिषकुमार गावंडे, गटनेता डॉ.राजेंद्र तायडे तसेच उपआयुक्‍त नरेंद्र वानखडे, शिक्षणाधिकारी डॉ.अब्‍दुल राजीक, समाज विकास अधिकारी धनंजय शिंदे, मनपा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजन धिरज सावरकर दिव्‍यांग शिक्षण समन्‍वयक, सचिन कराळे थेरीपीस्‍ट, कैलास कुलट विशेष शिक्षण विभागाचे कर्मचारी यांनी केले.

Related Articles

Back to top button