मराठी

वाठोडा शुक्लेश्वर येथे पूर्णा नदीपात्राच्या किनाऱ्यावर वृद्धमहिला मृतावस्थेत आढळली

आसेगाव पोलीस स्टेशन मध्ये दोन दिवसापूर्वी हरवल्या संदर्भात तसरे कुटुंबीयांनी कांताबाई तसरे ही वृद्ध महिला हरवल्याची तक्रार नोंदवली होती

वाठोडा शुक्लेश्वर प्रतिनिधी :- खोलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाठोडा शुक्लेश्वर येथील पूर्णा नदीपात्रामध्ये वाहून आलेली एका महिला पूर्णा नदीच्या किनाऱ्यावर मृतावस्थेत काही गावातील लोकांना आढळून आल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली होती,
सदर महिला वाकि रायपूर येथील असल्याचे समजले असता वाकी गावातील काही लोक वाठोडा शुक्लेश्वर येथील पूर्णा नदी पत्रावर आले असतानी  त्यां वृद्ध महिलेचा ओळख पटली नातेवाईकांनाही यासंदर्भात माहिती दिली,
कांताबाई निळकंठराव तसरे वय 75 वर्ष राहणार वाकि रायपूर असे मृत महिलेचे नाव आहे,
काताबाई तसरे  नेहमीप्रमाणे नदीमध्ये हार फुल पूजा पाठ चे साहित्य घेऊ नये शिकून देण्याकरिता गेली असता अचानक पाण्यामध्ये वाहून गेली असल्याची माहिती गावातील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे
नागरिकांनी या संदर्भात खोलापूर पोलिस स्टेशनला माहिती दिली.
खोलापूर पोलीस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार विलास बोपटे यांनी आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे पाठविले. तरी पुढील तपास खोलापूर पोलीस स्टेशन करीत आहे.

Back to top button