मराठी

जिलेटिनच्या स्फोटानं हादरला दहा किलोमीटरचा परिसर

बंगळूर/दि.२२ – कर्नाटकातील शिवमोगा येथे गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास डायनामाइटचा स्फोट झाला, त्यात आठ कामगार ठार झाले. मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी उच्चस्तरीय तपासाचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी सकाळी पोलिस आणि अधिकार्‍यांची टीम घटनास्थळ हुनासोडू गावात पोहोचली. संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दगड फोडण्यासाठी विस्फोटके (जिलेटिन स्टिक्स) नेली जात होती. तेव्हाच शिवमोगा येथील अब्बलगेरे गावाजवळ स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की त्याचा आवाज शिवमोगा जवळचा जिल्हा चिकमंगळूरपर्यंत ऐकू आला आणि आजूबाजूच्या भागात भूकंपसदृश धक्केजाणवले. काही लोकांचा दावा आहेकी एकापाठोपाठ एक 50 डायनामाइट ब्लास्ट झाले. स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूच्या घराच्या काचा फुटल्या. लोकांना वाटलं की भूकंप आला आहे. यामुळे लोक घाबरुन घरातून बाहेर निघाले. आठ-दहा किलोमीटरपर्यंत स्फोटकांचा गंधदेखील जाणवला.
शिवमोगा येदियुरप्पा यांचा मूळ जिल्हा आहे. शिवमोगा ग्रामीणचेआमदार अशोक नाईक म्हणालेकी सर्वत्र धूर होता. काहीही दिसत नव्हते. शिवमोगाचे उपायुक्त के.बी. शिवकुमार म्हणाले, की संपूर्ण परिसरात पोलिस बंदोबस्त आहे. घटनास्थळावर अजून काही स्फोटके असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. शिवमोगा दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर लिहिले, की लोकांनी प्राण गमावल्यानेमी दु: खी आहे. त्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. राज्य सरकार लवकरच या दुर्घटनेमुळे नुकसान झालेल्यांना मदत जाहीर करेल.

Related Articles

Back to top button