मराठी

अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांचा सत्कार

भाजप कामगार आघाडीचे आयोजन

नांदगांव पेठ/दि.२६ – भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत अत्यंत मोलाचे योगदान देणारे थोर व्यक्तिमत्व,एकात्ममानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या १०४ व्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी नांदगांव पेठ  येथे  त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून अभिवादन करण्यात आले.तसेच कोरोना महामारी च्या या संकटात स्वताचे जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या ४२ आशा वर्कर कर्मचारी व अंगणवाड़ी सेविका यांना साडी चोळी, फेस शील्ड,हात मोजे व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सम्मान करण्यात आला.
      भाजपा जिल्हाध्यक्ष सौ.निवेदिता दिघडे चौधरी,महामंत्री प्रशांत शेगोकार, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सत्यजितसिंह राठौड,अमरावती तालुका अध्यक्ष राजकुमार पावड़े,सरचिटणीस राजू चिरडे,सुनील जवंजाळकर आदी मान्यवरांच्या हस्ते अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेवीका यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कोरोना महामारीच्या काळात वैद्यकीय सेवेसोबत आशा स्वयंसेवीका व अंगणवाडी सेविका यांनी आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य पार पाडले त्याबद्दल भाजप कामगार आघाडीच्या वतिने हा सम्मान आयोजित करण्यात आला होता.
       भाजप कामगार आघाडीच्या कार्यालयासमोर हा कार्यक्रम सामाजिक अंतर राखून पार पाडण्यात आला.यावेळी युवा मोर्चा सरचिटणीस धीरज गिरे,संजय पकड़े,सुरेश गाडवे,लक्ष्मण शिंगनजुड़े, अनूप भगत,अर्जुन चव्हाण,अजिंक्य वानखडे,अजय गोरले, सूरज राठौड,ओम कोठार,भीमराव इन्दोरे,निलेश आसरकर,क्षमा बैस,रामकली वैष्णव,सिंधु डोईफ़ोडे,ललिता आसरकर,आशा सोनटक्के,संजीवनी मुकुंद,निशा राठौड,उमा राऊत, रेखा लसनकार,शीतल आसरकर,सुनंदा सुने,कांबळे ताई तसेच सर्व मोर्चा व आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button