मराठी

जिल्ह्यात आणखी 21 रूग्ण आढळले

अमरावती, दि. 6 : नागपूरच्या ध्रुव व सुविश्वास लॅबच्या अहवालानुसार अमरावती शहरात 21 नवे रूग्ण आढळले आहेत. त्यानुसार आज आढळलेल्या रूग्णांची संख्या 50 झाली आहे. जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेल्या रूग्णांची संख्या 2 हजार 722 झाली आहे.
हे 21 रूग्ण अमरावती शहरातील आहेत. त्यात शेगाव नाका येथील 45 वर्षीय पुरूष, मांगीलाल प्लॉट येथील 33 वर्षीय महिला, सुभाष कॉलनीतील 15 वर्षीय युवक, कॅम्पमधील जोशी लेआऊट येथील 54 वर्षीय महिला, नवे बडनेरा येथील 46 वर्षीय पुरूष, शेगाव नाका येथील अप्पू कॉलनीतील 59 वर्षीय महिला, मुजफ्फरपुरा येथील 50 वर्षीय पुरूष, बालाजीनगरातील 47 वर्षीय पुरूष, गुलाबबाबा कॉलनीतील 47 वर्षीय पुरूष, साईनगरातील 62 वर्षीय पुरूष, न्यू स्वस्तिकनगरातील 53 वर्षीय महिला, किरणनगरातील 55 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे, रायली प्लॉट 62 वर्षीय पुरूष, दहिसाथमधील पाच वर्षीय बालक, विवेकानंद कॉलनीतील 53 वर्षीय पुरूष, एसआरपीएफ कॅम्पमधील 42 वर्षीय महिला, जुन्या बडने-यातील 14 वर्षीय बालिका, अंबापेठेतील 18 वर्षीय पुरूष, चपराशीपुरा येथील 55 वर्षीय महिला, पटेलनगरातील 48 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. तसेच, केवळ अमरावती असा पत्ता दर्शविलेल्या 37 वर्षीय महिलेचाही  कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button