वरुड/दि. २९ – येथुन जवळच असलेल्या जरुड येथे नाशिक येथील स्वराज्य संस्थाच्या सुजाता कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण गावात नवीन नलपुरवाठा करण्यासाठी खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे बापूराव किसनराव राऊत या ९० वर्षीय वृद्धाचा रस्त्यात पडून नुकताच मृत्यू झाला.
स्थानिक पत्रकार विष्णु राऊत यांचे वडील बापुराव राऊत हे आपल्या घरुन हळूहळू पाय मोकळे करण्याच्या उद्देशाने गुजरी बाजारात गेले परत येताना जल स्वराज्य २ अंतर्गत गावात नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. यासाठी संपर्ण गावात खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे सामान्य नागरिकांना चालले कठीण असताना बापुराव राऊत हे रस्त्यात पडले आणि डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. या अगोदरही पंढरी पिंपळकर या वृद्धाचा रस्त्यात पडून मृत्यु झाला होता.
जलस्वराज्य २ अंतर्गत जरुड मध्ये तब्बल १० कोटी रुपयांचा कामाचा ठेका नाशिक येथील सुजाता कंपनीला मिळाला गेल्या दोन वर्षांपासून अत्यंत संथ गतीने काम सुरु असल्याने गावात २९ कि.मी.ची नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु असल्याने गावात रत्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. त्यामुळे धड चालणेही अवघड होते. दोन वृद्धांचा रस्त्यात पडून मृत्यू होऊन काम केव्हा पुर्ण होणार? हे सांगणे कठीण आहे.