मराठी

दोन वर्षांच्या आतील मुलांना प्रतिजैविके धोकादायक

मुंबई/दि.७ – दोन वर्षाखालील मुलांना अधिक प्रतिजैविक देणे धोकादायक आहे. त्यामुळे दम्याचा आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो.मेयो क्लिनिकमधील संशोधनाचा आधार घेतला, तर प्रतिजैविकांचा जास्त वापर केल्याने प्रतिकारशक्ती कमी होते. एकदा किंवा दोनदा शिंका झाल्यास आपण मुलांना प्रतिजैविक औषध देतो; परंतु  सावध राहा. दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना जास्त प्रतिजैविक औषध दिले तर भविष्यात त्यांना दमा, लठ्ठपणा किंवा इसब यासारखे आजार होऊ शकतात. अमेरिकेच्या मेयो क्लिनिकच्या संशोधनात हा दावा केला गेला आहे. प्रतिजैविके शरीरातील चांगले बॅक्टेरियादेखील काढून टाकतात, असे शास्त्रज्ञ म्हणतात. अँटीबायोटिक्सचे काम शरीराला हानी पोहोचविणारे बॅक्टेरिया नष्ट करणे आहे; परंतु ब-याचदा ते पोट आणि आतड्यात असलेल्या बॅक्टेरियांना दूर करतात. परिणामी, संसर्गाविरूद्ध लढण्याची शरीराची क्षमता कमी होते. संशोधकांनी 14 हजार पाचशे मुलांच्या आरोग्याच्या नोंदी तपासल्या. यापैकी 70 टक्के मुलांना दोन वर्षांच्या वयातच प्रतिजैविके देण्यास सुरुवात झाली.
लहान वयात प्रतिजैविक औषध दिल्यामुळे त्यांचा दमा, लठ्ठपणा, फ्लू, एकाग्रता कमी होणे आणि अधिक राग यासारख्या समस्यांशी संबंध आहे. बॅक्टेरिया सुपरबग बनतात अँटीबायोटिक्स बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी कार्य करतात, असे संशोधक नॅथन लिबरेजर म्हणतात. ते व्हायरस किंवा बुरशीला मारत नाहीत. तथापि, व्हायरल इन्फेक्शनच्या उपचारांसाठी डॉक्टर ब-याचदा मोठ्या प्रमाणात अँटीबायोटिक्स घेण्याची शिफारस करतात. त्यामुळे सुपरबग्ससारख्या हानिकारक जीवाणूंवर या औषधांचा काहीही परिणाम होत नाही. संशोधक नॅथन ब्राझर म्हणतात, की पेनिसिलिन हे डॉक्टरांद्वारे लिहून दिले जाणारे सर्वात सामान्य अँटिबायोटिक औषध आहे. त्यामुळे मुलांचे वजन जास्त होऊ शकते किंवा दम्याचा धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत प्रतिजैविक औषधांचा थोड्या प्रमाणात वापर करणे हाच उत्तम पर्याय आहे जेणेकरून ते बॅक्टेरियांना अकार्यक्षम ठरू शकत नाही आणि अशा आजारांचा धोका वाढत नाही.

Related Articles

Back to top button