मराठी

चिंता वाढली! राज्यात 3 लहान मुलांना ओमायक्रॉनची लागण

लहान मुलांचं लसीकरण आणि बुस्टर डोसबाबत लवकर निर्णय घेण्याचा मागणी

मुंबई /दी.०६- ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये आहे. राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक गटाची आज दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीत लहान मुलांच्या लसीकरणाबाबत महत्त्वाची चर्चा होणार आहे. मुलांच्या लसीकरणासंबंधी केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे. लहान मुलांच्या लसीकरणाबद्दल केंद्रानं लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी केली आहे. कारण पिंपरीमधील ओमायक्रॉन झालेल्या 6 जणांपैकी 3 लहान मुली आहेत. 12, 7 आणि दीड वर्षांच्या मुलीला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. एक 44 वर्षीय महिला 2 मुलीसंह नायजेरियातून पिंपरी चिंचवडमध्ये आली होती. ती आपल्या भावाला भेटायला आली होती. या महिलेच्या संपर्कात आलेल्या 2 मुली, भाऊ आणि त्याच्या 2 मुली अशा एकूण 6 जण ओमायक्रॉनबाधित आढळले. यापैकी 3 मुली अल्पवयीन आहेत.

Back to top button